लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर, ताबडतोब ICU मध्ये दाखल; कोणालाही भेटण्याची परवानगी नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ब्रीच कँङी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांना सुरक्षितपणे हलवण्यात आले. मागील सात दिवसांपासून लता दिदींवर उपचार सुरू आहेत. अगदी सुरुवातीला त्यांच्यात कोरोनाची लक्षणे काहीच नव्हती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता अधिक खालावली असून कुणालाही लता दिदींना भेटण्याची अजिबात परवानगी नाही, असे ङॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

ब्रीच कँङी रुग्णालयाचे ङॉ. प्रतीक समाधानी यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारण त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया रोगाची देखील लागण झाली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या अधिकच खालावली आहे.

See also  नेहा कक्करची बहीण सोनू कक्करचा पती आहे 'ही' प्रसिद्ध व्यक्ती, खूपच रोमॅन्टिक आहे यांची लवस्टोरी...

उपचार पद्धतीला प्रतिसाद दिला तर हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, मात्र साधारणपणे किती दिवस लागतील, हे सांगू शकत नाही. असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या ङॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या लता दिदी ह्या लवकरात लवकर बर्या व्हाव्या, यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी, असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

लता मंगेशकर यांची भाची रचना शाह यांनी गुरुवारी सांगितले होते की, पूर्वीपेक्षा आता लता दीदींची तब्येत व्यवस्थित आहे. त्या म्हणाल्या होत्या की,”ती आता बरी होत आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. सर्व लोकांच्या प्रार्थना कामी आल्या.” रचना शाह यांच्या म्हणण्यानुसार लताजींच्या वयानुसार त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे अधिक चांगल्याप्रकारे त्यांची काळजी घेता येऊ शकते.

See also  मराठा आरक्षणासंदर्भात युवराज छत्रपती संभाजी राजेंचे महाराष्ट्र शासनाला खुले पत्र...

मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार लता दिदींची तब्येत पुन्हा खालावली असून कित्येक चाहत्यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर त्या लवकरात लवकर ठीक व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment