भारताच्या गानकोकिळा यांचा जीवनप्रवास थांबला, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारताच्या गानकोकिळा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँङी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्यूमोनियाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनाविषयी त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी माहिती दिली.

संपूर्ण देशभरातील लोकांच्या आयुष्याला अमृतापरी संजीवनी देत आलेला सूर आज अखेरीस आपल्यातून निघून गेला. लतादीदींनी आपल्या कारकीर्दीत संगीत प्रेमी असो किंवा श्रोते असो..सर्वांना सुमधूर संगीताचा आनंद दिला आहे. आपल्या कलेच्या इतिहासात असा एकही कलाकार आपल्याला शोधून सापडणार नाही, ज्याने आपल्या कलेतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. दिवस असो वा रात्र… लता दीदींचा स्वर ऐकल्याशिवाय संगीतप्रेमींचा दिवसच जात नाही. परंतु आता त्यांचा आवाज कसा ऐकणार, या शब्दांत पु.ल. देशपांडे यांनी लता मंगेशकर यांच्या कलेचे वर्णन केले आहे.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे प्रेग्नन्ट?, ऐकून विश्वासच बसणार नाही!

लता मंगेशकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की,”माझे दुःख हे शब्दांच्या पलीकडील आहे. मायाळू आणि सर्वांची काळजी घेणार्या लता दिदी आज आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. जी कधीच भरून निघणार नाही. यापुढील येणाऱ्या आपल्या कित्येक पिढ्या ह्या आपल्या गानकोकिळेच्या सुरांनी मंत्रमुग्ध होतील व त्यांना आजन्म लक्षात ठेवतील”, असे त्यांनी म्हटले आहे.

राषट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच खूप दुःख झाले आहे. भारतरत्न लतादीदींचे कर्तृत्व अतुलनीय राहील. तसेच लता मंगेशकर यांचे निधन हे देशाचे खूप मोठे नुकसान आहे. त्यांचे संगीत अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. दीदींच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

See also  अभिनेत्री कतरिना कैफने केले सलमान खानवर आरोप, म्हणाली सलमानने सेटवर...

लता मंगेशकर यांना 2001 साली संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्धल “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी थांबला असेल, तरी त्यांच्या दैवी सूरांतून आणि सुमधूर आवाजातील संगीतातून आपल्या चाहत्यांच्या मनात सदैव राहतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'शोले' चित्रपटातील गब्बरची मुलगी आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड, तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment