अर्जुन कपूरची नवीन गर्लफ्रेंड, मलायकाला सोडून अर्जुन तारा सुतारिया सोबत इटलीत करतोय रोमँस…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूडची फिटनेस गर्ल मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात. मलायका आणि अर्जुन यांच्या रिलेशनशिपची खबर सर्वानाच आहे. दोघांच्या वयात जवळपास बारा वर्षाचे अंतर असूनही त्यांची केमिस्ट्री खुपच आकर्षक आहे. मलायका अनेकांच्या आवडीची अभिनेत्री आहे, त्यामुळे सोशल मीडियावर देखील अनेकजण तिची चर्चा करत असतात. सध्या अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने लक्ष वेधून घेत आहे.खास करून अर्जुन कपूर मुळे या चर्चेला उधाण आले आहे.

अभिनेता अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. फिल्म “एक विलन रिटर्न्स” मध्ये हे दोघे एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या जोडीला आतापासूनच लोक लाईक देत आहेत. अलीकडेच या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे, या गाण्यात अभिनेत्री तारा सुतारीया आणि अर्जुन कपूरची केमिस्ट्री विशेष लोकप्रिय ठरत आहे. त्यांची जोडी चांगलीच रमली आहे, शिवाय हे दोघेही लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहेत. या दोघांसोबतच दिशा पटानी आणि जॉन अब्राहम हे दोघेही दिसत आहेत.

See also  जेव्हा गौरी खानच्या भावाने शाहरुख खानला दिली होती जिवंत मा'रण्याची ध'मकी, तेव्हा शाहरुखने...

सोशल मीडियावर मात्र या गाण्यासोबत तारा आणि अर्जुनची खास चर्चा सुरू आहे. दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत. ही ऑनलाइन-स्क्रीन आणि ऑन-स्क्रीन जोडी अनेकांना आकर्षित करत असून त्यांचे शानदार फोटो पाहून लोक भलतेच खुश झाले आहेत. इन्स्टाग्रामवर देखील त्यांचे काही फोटो विशेष गाजले आहेत, अनेकजण या फोटोला लाईक्स तर देतच आहेत शिवाय यावर वेगवेगळे कमेंट्स देखील करत आहेत. हे फोटो शेअर करत तारा कॅप्शनमध्ये म्हणते “हे आम्ही आहोत! कधी आम्ही भुकेले असतो,

तर कधी एकमेकांचे गाल ओढतो,निरनिराळे विनोद सांगून पुन्हा त्यावर मनसोक्त हसतो, एकमेकांना निरनिराळ्या निक नेम्सने बोलावतो, कधी कधी आम्ही यासाठी भांडतो की, आम्हाला काहीतरी खाण्याची गरज असते” या चित्रपटाच्या निमित्ताने तारा आणि अर्जुनची चांगलीच मैत्री झाली आहे. “एक विलन रिटर्न्स” ही फिल्म मोहित सुरी द्वारा निर्माण केली जात आहे, २०१४ मध्ये आलेली फिल्म “एक विलन” चा सिक्वेल आहे हा नवीन चित्रपट. “एक विलन” चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख,श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत दिसले होते.

See also  अबब ! शाहरुखचा मुलगा आर्यन खानने मागितली विज्ञानाची पुस्तके, कारण जाणून थक्क व्हाल!

“एक विलन रिटर्न्स” या चित्रपटात तारा सुतारीया, अर्जुन कपूर, दिशा पटानी, जॉन अब्राहिम झळकणार आहेत. हा चित्रपट २९ जुलै रोजी सिनेमा घरात रिलीज होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक लोक प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाची कथा पुन्हा एकदा पडद्यावर नव्याने झळकणार त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर मित्रहो तुम्ही देखील २९ जुलै रोजी सिनेमा गृहात हा चित्रपट सहपरिवार नक्की पहा. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, जर हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment