अभिनयासाठी सोडले पुणे आणि गाठली मुंबई… आज आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेत्री विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यामुळे अनेक चाहते मंडळी त्यांच्या वर नेहमीच फिदा असतात. या कलाकारांसाठी त्यांची कला खूप महत्वाची असते, त्यासाठी हे कलाकार काहीही करू शकतात. मित्रहो अशीच एक अभिनेत्री जिने आपल्या अभिनयासाठी पुणे सोडले व मुंबई गाठली. आज तिने स्वतःची एक उत्तम ओळख बनवली आहे. सर्वत्र तिचे चाहते आहेत, म्हणून तर पडद्यावर आणि पडद्यावर ती खूप लोकप्रिय आहे.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून मुक्त बर्वे आहे, मुक्ताच्या अनेक भूमिका खूप गाजल्या आहेत. तिच्या अभिनयात एक वेगळीच जादू आहे,अगदी स्वच्छ आणि सुंदर अशा तिच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील ती एक गाजलेली अभिनेत्री आहे, मूळची पुण्याजवळील चिंचवड परिसरातील आहे. वडील वसंत बर्वे, आई शिक्षिका व नाट्य लेखिका विजया बर्वे असे त्यांचे नाव आहे. मुक्ता बर्वे ही लहानपणापासूनच कलाप्रेमी आहे. तिला अभिनय खूप आवडतो. नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्ट मधून ती समोर येते.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मालिकेतील ममता काकुंच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितीये? जाणून घ्या सविस्तर...

शाळा कॉलेजमध्ये असतानाच मुक्ताने अनेक नाटकात सहभाग घेतला होता. त्यानंतर २००० साली तिने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी सुरुवात केली. तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. तिने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाट्य शास्त्राची पदवी मिळवली आहे. आजवर तिने अनेक मलिक, नाटक, चित्रपटातून काम केले आहे. २००९ साली “जोगवा” चित्रपटातून ती विशेष प्रसिद्ध झाली होती, यातील भूमिकेसाठी तिला पुरस्कार देखील मिळाला होता.

तसेच २०१२ मध्ये “एका लग्नाची दुसरी गोष्ट” या मालिकेत ती झळकली होती. यामध्ये तिने राधा देसाई ही भूमिका साकारली होती. “जोगवा” नंतर २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित “मुंबई पुणे मुंबई” चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिने अतिशय सुंदर अभिनय केला होता. यातील भूमिकेसाठी देखील तिला पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात मुक्ता आणि स्वप्नील जोशी या दोघांनी एकत्र काम केले होते. तीने “सावर रे” ,”एक डाव धोबी पछाड”, “थँक्स मा” यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

See also  ही मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच बनणार 'आई', पाहिलेत का तुम्ही तिचे बेबी शॉवरचे फोटोज्

“लग्न पाहावे करून” या चित्रपटात देखील मुक्ता दिसून आली होती. आजवर तिने अनेक भूमिका खुपच सुंदर निभावल्या आहेत. तिला अनेक लोक खूप पसंत करतात. प्रत्येक वेळी ती नव्याने नवीन भूमिका घेऊन रसिकांच्या भेटीस येत असते. ती नेहमी अशीच लोकप्रिय राहो ही सदिच्छा. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment