आई झालेल्या या महिला IAS चं जगभरातून कौतूक, कामगिरी पाहून तुम्हीही कराल सलाम!
असेच विचार आचारात आणा ज्याची गरज या देशाला आहे असं महात्मा गांधी म्हणून गेले. याच विचारांची सांगड घालत एका डीसी किरण पासी यांनी देश आणि जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या गोंडाच्या डीसी किरण पासी यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
रविवारी सकाळी गोदा सदर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनी मुलाला जन्म दिला आणि आईएएस अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या महागड्या आरोग्य नाकारल्या. प्रसूती वेदना झाल्यानंतर सकाळी 6 वाजता डीसी किरण पासी यांना सदर रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी 8:30 वाजता ऑपरेशननंतर त्यांनी मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ निरोगी आहेत.
दोन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रसूतीसाठी डीसी किरण पासी यांनी सदर रुग्णालयाची निवड केली जेणेकरून सरकारी यंत्रणा आणि डॉक्टरांना वर सामान्य लोकांचा विश्वास वाढेल आणि कमी खर्चात चांगले उपचार मिळतील. जिल्ह्यात पदस्थापना झाल्यापासून डीसी आरोग्य व शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सतत पुढाकार घेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गाेड्डा सदर रुग्णालयाला सप्टेंबर – 2019 मध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून कायाकल्प पुरस्कार मिळाला.
डीसी किरण पासी यांचे पती पुष्पेंद्र सरोज कुमार म्हणाले की किरण सुरुवातीपासूनच आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. आता असे दिसते की येथे स्त्रीला प्रसूतीमध्ये कोणतीही अडचण होणार नाही. सुरुवातीपासूनच किरणवर सदर रूग्णालयाच्या डॉ.बाणदेवी झा आणि डॉ प्रभा राणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते.
सिव्हील सर्जन एसपी मिश्रा म्हणाले की, उपायुक्त यांनी इच्छा असती तर त्या लांब रजेवर राहिल्यानंतरही त्यांना महागड्या रुग्णालयात उपचार मिळाला असता. पण त्यांनी स्वतः सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवला. कायाकल्प पुरस्काराने आमची जबाबदारी वाढली आहे. उपायुक्त यांनी विश्वास व्यक्त केला आहे, त्यांचा सकारात्मक संदेश जाईल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.