बॉलीवूड मधील या आहेत सर्वात यशस्वी जोड्या, लग्नाला 30 ते 40 वर्षं झाली तरी आनंदाने सोबत संसार करत आहेत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मधील अभिनेते अभिनेत्री यांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललेलं आहे किंवा अजून बऱ्याच गोष्टी सतत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. तर आज आपण तीच उत्सुकता जी शिगेला पोचलेली असते माहिती देऊन पूर्ण करणार आहोत. बॉलिवूड मध्ये नातं हे खूप वेगळ्या प्रकारचे माध्यम आहे.

म्हणजे इथे कुणाचे कुणाशी कधी नाते होईल आणि कोण कधी कुणाशी नाते तोडले याचा भरवसा नाही; पण असेही काही लोकप्रिय कपल्स आहेत जे आदर्श बॉलिवूड मधील जोड्या म्हणून ओळखल्या जातात. तर त्या सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

बॉलिवूड मधील पूर्वीच्या काळातील सुपरस्टार राहिलेली अनेक जोडपी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आजही या जोडप्यांच्या प्रेमाचे उदाहरण दिले जाते. दिलीप कुमार-सायरा बानो, अमिताभ बच्चन-जया बच्चन, शाहरुख खान-गौरी खान अशा अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे या यादीत आहेत. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच काही जोडप्यांबद्दल सांगणार आहोत. जे वर्षानुवर्षे अजूनही एकमेकांना आधार देत आहेत. प्रत्येक अडचणीत ते एकमेकांच्या पाठीशी उभे असतात.

See also  'माफिया गॅं'ग माझी ह'त्या करेल...' या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सुंदर अभिनेत्री हेमा मालिनीला आपले हृदय दिले होते. अभिनेते धर्मेंद्र हेमा मालिनी बर खूप प्रेम करत होते. लोकप्रिय अभिनेत्री हेमाला मिळवण्यासाठी धर्मेंद्रने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. 1980 मध्ये त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर हेमा मालिनीसोबत लग्न केले. आज या दोघांच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांचा सहवास आजही सुरू आहे.

जितेंद्र-शोभा : जितेंद्रने 1974 मध्ये शोभाशी लग्न केले होते. या दोघांना तर आपण ओळ्खतोच. जितेंद्र एक उत्तम असे लोकप्रिय अभिनेते आहेत. शोभा एअर होस्टेस होती. जितेंद्र आणि शोभा यांच्या लग्नाला आज 47 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेव्ह जितेंद्र देखील अभिनेत्री हेमा मालिनीला आपले हृदय देऊन बसले होते. त्यांना ही प्रेम झाले होते; पण धर्मेंद्रने मध्येच येऊन त्याचे पान कापले. तर अशा गोष्टी बॉलिवूड मध्ये कायम घडतात.

शत्रुघ्न सिन्हा – पूनम सिन्हा : शत्रुघ्न सिन्हा यांचे पूनम सिन्हा यांच्याशी 1980 मध्ये लग्न झाले. दोघांच्या लग्नाला 41 वर्षे झाली आहेत आणि आजही त्यांचे घर चांगले चालले आहे. सुखी समृद्ध जीवन ते जगत आहे. सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय असलेली सध्याची यंग अभिनेत्री यांची मुलगी आहे.

See also  दिल्ली विमानतळावर अभिनेता अजय देवगणला मा'र'हा'ण? मा'रा'मा'रीच्या व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

अमिताभ बच्चन-जया बच्चन : अभिनेत्री जया बच्चन यांना पाहून सुंदरतेवर भाळून अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांच्या पहिल्या चित्रपट गुड्डीनंतरच लग्न केले. 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न केले. दोघांनी केलेल्या लग्नाला 48 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा ही सुखी संपन्न संसार सुरू आहे.

शाहरुख खान-गौरी खान : सुपरस्टार होण्यापूर्वीच शाहरुख खानला त्याचा जीवनसाथी मिळाला होता. शाहरुखने गौरी खानला मिळवण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. कारण गौरी आणि शाहरुख तेव्हापासून एकत्र आहेत जेव्हा शाहरुख काहीच नव्हता. 1991 मध्ये त्याने गौरीसोबत लग्न केले. आज शाहरुख आणि गौरीच्या लग्नाला जवळपास 30 वर्षे झाली आहेत. आजही ही जोडी बी-टाऊनमधील सर्वात प्रिय जोडींपैकी एक आहे. सतत चर्चेत सुद्धा राहते.

जॅकी श्रॉफ-आयशा श्रॉफ : जॅकी श्रॉफने 1987 मध्ये आयेशा श्रॉफसोबत लग्न केले. तेव्हापासून दोघे एकत्र आहेत. जॅकी आणि आयशा यांच्या लग्नाला 34 वर्षे पूर्ण केली आहेत. जॅकी श्रॉफची पत्नी माध्यमांपासून दूर राहणे पसंत करते.

See also  अभिनेता शाहरुख खान सोबत तब्बल 31 वर्षात अजय देवगणने एकदा ही केले नाही काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

अनिल कपूर-सुनीता : अभिनेता अनिल कपूरने 1984 मध्ये सुनिताशी लग्न केले. सुनीता एक मॉडेल होती. दोघांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत.

अजय देवगण- काजोल : अभिनेता अजय देवगण आणि काजोलची जोडी खूप आवडली आहे. काजोल आणि अजय देवगण यांनी 1999 मध्ये गुपचूप लग्न केले. दोघांच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत, पण आजही दोघेही हातात हात घट्ट पकडताना दिसत आहेत.

अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना : अभिनेता अक्षय कुमारच्या अफेअर्सबद्दल बऱ्याच मथळ्या होत्या. चर्चाच चर्चा होत्या. 2001 मध्ये त्यांनी अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले. आज अक्षय कुमार ट्विंकलसोबतचे त्याचे नाते खूप चांगले बजावत आहे. दोघांनी केलेल्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण केली आहेत. आज ते मुला बाळांसोबत सुखी आयुष्य एन्जॉय करत आहेत.

तर पाहिलत असे अनेक उदाहरणे आपल्याला घेता येतील. कारण बॉलिवूड मध्ये अश्या बऱ्याच जोड्या आहेत. ज्या पहिल्यापासून एकमेकांना आधार देत आलेल्या आहेत. तर या सर्वांना त्यांच्या यशस्वी वाटचाली साठी अजून खूप शुभेच्छा.

Leave a Comment