पाकिस्तानमधेही घुमतो भगवान भोलेनाथाच्या नावाचा जयघोष, जाणून घ्या पाकिस्तानामधील या रहस्यमयी मंदिरांविषयी…

भारतात पूजा-विधी, परंपरा, संस्कार, श्रद्धा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान श्री शिवशंकर उपासकांची संख्या भारतात लक्षणीय आहे. हर हर महादेव म्हणत कोटय़वधी भाविक विविध मंदिरात भगवान श्री शिवशंकराचे दर्शन घेतात. १२ ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध असलेली भगवान श्री शिवशंकरांची मंदिरे भारतात आढळतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही बम बम भोलेनाथचा गजर घुमतो. महाशिवरात्रीला पाकिस्तानातील या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. चला तर मग, जाणून घेऊया पाकिस्तानमधील भगवान श्री शिवशंकरमंदिरांविषयी..

कटासराज भगवान श्री शिवशंकरमंदिर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भगवान श्री शिवशंकराचे कटासराज मंदिर आहे. हिंदू धर्मियांसाठी हे मंदिर एका तीर्थस्थळाप्रमाणे आहे. हे मंदिर सुमारे ९०० वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे. देवी माता सती गेल्यानंतर शंकराला अश्रू अनावर झाले. यावेळी महादेवांच्या अश्रूंचे दोन थेंब पृथ्वीवर पडले. एक कटास येथे आणि दुसरा अजमेर येथे पडला. यातील कटास या ठिकाणी महादेवाच्या मंदिराची उभारणी करण्यात आली, असे सांगितले जाते. देखभाल नसल्यामुळे कटासराज मंदिरातील सरोवर आटत चालल्याचे समजते.

उमरकोट भगवान श्री शिवशंकरमंदिर : पाकिस्तानातील सिंध प्रांतात उमरकोट भगवान श्री शिवशंकरमंदिर आहे. हे मंदिर सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे आहे. अलीकडे ७२ वर्षांनंतर या मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. या मंदिराची उभारणी १० व्या शतकात झाली असून, खजुराहो मंदिरही याच काळात बांधण्यात आल्याचे समजते. या मंदिराच्या बांधकामात भारतातील स्थापत्य कलेचे प्रतिबिंब असल्याचे आढळून येते. फाळणीनंतर क’ट्ट’र’पं’थि’यां’नी या मंदिराचे मोठे नु’क’सा’न केले आहे.

कराची भगवान श्री शिवशंकरमंदिर : पाकिस्तानातील कराची येथे एक मोठे भगवान श्री शिवशंकरमंदिर आहे. या मंदिराची उभारणी १५० वर्षापूर्वी झाली आहे. या मंदिराला रत्नेश्वर महादेव या नावानेही ओळखले जाते. दर रविवारी या मंदिरात विशाल भंडारा असतो. या मंदिरात भगवान श्री शिवशंकरासह अनेक देवी-देवतांच्या मूर्त्यां आहेत. फाळणीनंतर क’ट्ट’र’वा’द्यांनी या मंदिराचेही मोठे नु’क’सा’न केले होते. २०१४ मध्ये पाकिस्तानातील हिंदूंनी हे मंदिर वाचवण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.

मनसहेरा भगवान श्री शिवशंकरमंदिर : पाकिस्तानमधील चित्ती गट्टी भागात एक भगवान श्री शिवशंकर मंदिर आहे. हे मंदिर केवळ पाकमधील हिंदूंच्या अस्तित्वाचे प्रतीक नाही, तर याला ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरातील भगवान श्री शिवशंकरलिंग सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचे आहे.

महाभगवान श्री शिवशंकररात्रीला येथे मोठी यात्रा भरते. दररोज या मंदिरात पूजा-विधी केले जात नाहीत. मात्र, महाभगवान श्री शिवशंकररात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. या मंदिरात भगवान श्री शिवशंकरलिंगाव्यतिरिक्त गणपती, पार्वती आणि काली देवीच्या मूर्त्यां आहेत. या मंदिर परिसरात दुर्गा देवीची गुफाही आहे.

जोही भगवान श्री शिवशंकरमंदिर : पाकिस्तानात असलेल्या जोही भागातही भगवान श्री शिवशंकरमंदिर आहे. हे मंदिर २०० वर्षे जुने आहे. या मंदिराची रचना थोडी हटके असल्यामुळे मंदिर आकर्षक दिसते. फाळणीनंतर सर्वाधिक नुकसान या मंदिराचे झाले असून, चारही बाजूंनी मंदिर ढासळलेले आहे. तर काही ठिकाणी जुने अवशेष आढळून येतात. या मंदिरात अन्य देवतांच्या मूर्त्यां भग्न अवस्थेत आहेत. याची रचना भारतातील आणि नेपाळमधील मंदिरांशी साधर्म्य साधणारी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment