अरेरे ! बिचारा ख्रिसमससाठी गर्लफ्रेंडला भेटायला गेला आणि गावकऱ्यांनी लग्न लावूनच शिकवला त्याला धडा

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रेम हे प्रेम असतं…तुमचं आणि आमचं ते सेम असतं. याच प्रेमाखातर प्रत्येक व्यक्ती काहीही करायला तयार होतात. अशीच एक अजबगजब घटना सध्या समोर आली आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जाणं, ह्या मुलाला खूपच महागात पडले आहे. गावकऱ्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला असून त्यांचे लग्न सुद्धा लावून दिले. आपल्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या मूली सोबत ओळख झाल्यावर त्या मूलीला तो नेहमी भेटायला जात असे. मात्र तेथील ग्रामस्थ मंडळींना ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने त्या दोघांचेही लग्न लावून दिले.

मीडियाच्या माहितीनुसार बिहारमधील परशुरामपूर गावातील एक अल्पवयीन मुलगा आपल्या मैत्रीणीला भेटायला गेला. ते दोघेही एकाच वर्गात आणि एकाच कोचिंग क्लासेस मध्ये होते. तेथे त्या दोघांचीही एकमेकांसोबत ओळख झाली आणि त्यांची घट्ट मैत्री झाली. या मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. तो मुलगा जमेल तसे त्या मूलीला भेटायला गावात जात असे. परंतु ही गोष्ट गावकऱ्यांना खटकायची.

See also  'हा' होता भारतातील सर्वात अय्याश राजा, त्याचे कारनामे ऐकून थक्क व्हाल!

ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या मुलाला गावकऱ्यांनी पकडले. तेथे सर्व ग्रामस्थ मंडळी गोळा झाले. त्या मुलासोबत त्या मूलीला सुद्धा गावाकडील मंदिरात आणले व जबरदस्तीने त्यांचे एकमेकांसोबत लग्न लावून दिले. ते दोघेही अल्पवयीन आहेत, याचा सुद्धा गावकऱ्यांनी विचार केला नाही. आपल्याला सोङून द्यायची विनंती तो मुलगा वारंवार करत राहिला. परंतु गावकऱ्यांनी त्याचे काही एक ऐकले नाही. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड वायरल होत आहे.

जोरजबरदस्तीने त्या अल्पवयीन मूलीचे लग्न लावून देण्याच्या ग्रामस्थांच्या कृत्याने दोघांच्याही घरच्यांनी निषेध केला आहे. त्याचप्रमाणे तेथील ग्रामस्थांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून अल्पवयीन मुलांचं अपहरण करून त्यांचे एकमेकांसोबत लग्न लावून देण्यात आले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु सोशल मीडियावर मात्र हे प्रकरण चांगलेच रंगलेले दिसत आहे.

See also  तृतीयपंथीयांवर असे केले जातात अं'त्यसंस्कार, चुकूनही तुम्ही हे पाहू नका, अन्यथा भोगावे लागतील हे भयानक परिणाम...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment