‘माझ्या नवर्‍याची बायको’ मालिकेतील राधिका अर्थात अनिता दातेची प्रेम कहाणी ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका म्हणजे माझ्या नवर्‍याची बायको. अर्थातचं या मालिकेतील एकूण एक पात्राने रंगवलेल्या भुमिकेतून रसिकप्रेक्षकांची मन अवघ्या काही वेळातच जिंकून घेतली. त्यात निर्विवादपणे नावे घ्यायची झाली तर मालिकेच्या केंद्रबिंदू असलेल्या तीन व्यक्तिरेखा राधिका, गुरू आणि शनाया.

anita date

यांपैकी राधिकाची भुमिका फार महत्वाची आणि वेगळ्या साच्यातली ठरत गेली. तिला टप्प्याटप्यांवर बदलं आणावे लागले. तेव्हा कुठे राधिकाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आली. तर आज आपण याच राधिका अर्थात अनिता दातेची जबरदस्त फिल्मी लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.

तुम्हाला माहितचं असेल की, अनिता दाते हिचं लग्न चिन्मय केळकर याच्यासोबत झालेलं आहे. तिचा मिस्टर चिन्मय हादेखील सिनेसृष्टीशी निगडीत आहे. चिन्मय हा एक लेखक असून तो अनेक वर्षांपासून अनुराग कश्यप या प्रतिभावंत दिग्दर्शकासोबत काम करतो. दुसरीकडे अनिताचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच फार आवडला आहे.

See also  तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीत येतेय श्री साईबाबांवर आधारित मालिका, या वाहिनीवर प्रसारित होणार मालिका...

beingmarathi 20181029 0001

माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेने एकप्रकारे अनिताला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली असंही म्हणावं लागेल. पण मुळातच एक बाब म्हणजे, अनिता याआधीही बऱ्याचदा सिनेसृष्टीत कार्यरत होती. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीसोबतही अनिताने काम केलं होतं. त्याशिवाय तिने हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबतही काम केलं आहे. यासोबतच राणी मुखर्जीच्या हिंदी अय्या या सिनेमात अनिता काम करताना दिसली होती.

Anita Date with her husband

अनिता दाते मुळची नाशिक येथील आहे. ती ललित कला केंद्रात असतानाच तिची आणि चिन्मय या दोघांची ओळख झाली. त्यावेळी दोघांमधे केवळ मैत्रीचचं नातं होतं. परंतु एका नाटकाच्या दरम्यान दोघांना आपण प्रेमात पडल्याची जाणीव झाली. “सिगारेट” या नाटकाची तालीम चालू होती आणि नेमकं त्याचवेळी दोघांना आपण प्रेमात असल्याची जाणीव झाली.

See also  फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरीचा पारा चढला, ट्रोलर्सची केली बोलती बंद, म्हणाली, "मर्दानगी मुलीच्या कमेंट बॉक्समध्ये..."

चिन्मय आणि अनिता हे जोडपं काही काळ नात्यात होतं परंतु तरीही दोघांना अद्याप लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे त्यावेळी एक मधली वाट शोधत दोघांनी लिव्ह इन मधे रहायचं ठरवलं. आणि फायनली दोघे चक्क थेट दीड वर्ष लिव्ह इन मधे राहिले. त्यानंतर दोघांच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षदा पडल्या. सध्याच्या घडीला म्हणाल तर एक भन्नाट आणि एकजूटीच्या साथीचं उदाहरण देणारं हे जोडपं आहे असं म्हणावं लागेल.

Anita Date Spouse Chinmay Kelkar

कारण दोघांच्याही लग्नाला जवळपास 11 वर्ष झाले आहेत. अनिता आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेकदा दोघांचे एकत्र फोटोजही शेअर करत असते. चिन्मय हा केवळ एक लेखक नाही तर अभिनेता, पटकथालेखक, कास्टिंग दिग्दर्शक, अशा विविध भुमिका तो पार पाडताना दिसतो.

चिन्मय केळकरच्या सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या कामांबद्दल म्हणायचं झालं तर आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, एक हजारांची नोट, ॲण्ड गांधी गोज मिसिंग, टाईमपास 2 यांसारख्या सिनेमांमधे त्याचा समावेश आहे. अनिताने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांचा एक फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन लिहिला होता. तो असा की, “मी घरी खूपच कमी वेळ देते तुला… म्हणून संसार सुखाचा चाललायं आपला…” तर एकूणच अशा या दोघांची ही खास भन्नाट गोष्ट आहे.

See also  प्रसिद्ध अभिनेत्रीने या कारणांमुळे अर्ध्यातूनचं सोडली “स्वामिनी” मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

untitled 1 1504002021

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment