शरीरावर “या” भागावर तीळ असलेल्या व्यक्ती असतात खूपच नशीबवान व उच्चश्रीमंत, जाणून घ्या यामागील रहस्य

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“सौंदर्य” सर्वांनाच भुरळ घालणारे, चटकन मोहात पाडणारे, पाहताक्षणी आकर्षित करणारे.. आपण लाखात एक सुंदर शोभून दिसावे, यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप धडपड करते. अगदी नवनवीन टिप्स वापरून आपण स्वतःला नेहमी सुंदर ठेवतो. पण देवाने दिलेल्या या अलौकिक सौंदर्यात भर पाङते म्हणजे आपल्या शरीरावरील तीळ…जे खूपच उठून दिसतात.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर कुठेतरी तीळ असतात. परंतु तुम्हांला या तीळामागील रहस्य माहित आहे का हो? कारण शरीरावर काही विशेष ठिकाणी असलेले तीळ हे आपलं नशीब उजळवणारे, दीर्घश्रीमंत बनवणारे असतात. काय तर मग तुम्हीपण हे माहीत करून घेण्यासाठी उत्सुक आहात ना.. चला तर मग पाहूया, शरीरावर कोणत्या भागात असणारे तीळ ठरतात आपल्यासाठी लाभदायक.

See also  पापमोचनी एकादशीचा अद्भुत योगायोग, जाणून घ्या या तिथीचे धार्मिक महत्व, शुभमुहूर्त व पूजाविधी सविस्तर...

उजवा गाल : ज्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असतात. त्या व्यक्ती अतिशय श्रीमंत असतात. तसेच या व्यक्तींना आपल्या आयुष्यात धन- संपत्ती कधीच कमी पडत नाही. मात्र याउलट अपवादात्मक परिस्थिती देखील आढळू शकते.

ओठ : आपले ओठ हे सौंदर्यात मोलाची भर पाडतात. ओठांमुळेच तर प्रत्येक व्यक्तीचे सौंदर्य अगदी सुंदर आणि मोहक दिसते. मात्र ज्या व्यक्तीच्या ओठांवर तीळ असतो, त्या व्यक्ती अतिशय आकर्षित दिसतात.

नाक : बहुतांश लोकांचे नाक थोङे मोठे असते. तर काही लोकांचे छोटे आणि सरळ असते. परंतु ज्या व्यक्तींच्या नाकावर तीळ असतो, त्या खूपच भाग्यवान असतात. तसेच त्यांना आयुष्यात पैसा, धन- संपत्ती कधीच कमी पडणार नाही.

कंबर : नाजूक- साजूक कंबर ही सर्वांचे लक्ष वेधून घेते. परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या कंबरेवर तीळ असेल तर ती व्यक्ती नशीबवान समजली जाते. तसेच तो तीळ त्या व्यक्तीचे सौंदर्यात मोलाची भर पाडतो.

See also  पाकिस्तानमधेही घुमतो भगवान भोलेनाथाच्या नावाचा जयघोष, जाणून घ्या पाकिस्तानामधील या रहस्यमयी मंदिरांविषयी...

कपाळ : बहुतांश व्यक्तींचे कपाळ हे मोठे असते, तर काही व्यक्तींचे सपाट कपाळ असते. मात्र ज्या व्यक्तीच्या कपाळावर तीळ असतो, त्या व्यक्तीचा थाट काही न्यारा असतो. कारण या व्यक्तींना ऐश्वर्य प्राप्ती होतेच. पण अशा व्यक्तींना परदेशी फिरण्याची संधी सुद्धा मिळते.

पोट : पोट हे आपसूकच आकर्षित करते. परंतु मोठे, गोलाकार फुगीर पोट पाहून अगदी कसेबसे वाटते. थोडक्यात म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे पोट हे त्यांचे सौंदर्यात भर पाङते. अगदी त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या पोटावर तीळ असतो, त्या व्यक्ती खूप मनमिळाऊ असतात. आपल्या सुंदर वागण्यामुळे त्यांना लोक अधिक पसंत करतात.

छाती : एखाद्या व्यक्तिच्या छातीवर तीळ असेल तर ती व्यक्ती प्रचंड नशीबवान समजली जाते. तसेच तो तीळ जर उजव्या छातीला असेल तर त्या व्यक्तीला मनपसंत जोडीदार मिळतो.

See also  'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत जिजाऊंची भूमिका साकारणार हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment