‘फुल और काटे’ मधील अभिनेता अजय देवगनची पहिली हिरोईन या घटनेनंतर रात्रभर रडत होती, कारण ऐकून तुम्हीही भावुक व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलीवूड मध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडत राहतात. मग त्यातल्या काही चांगल्या असतात तर काही वाईट. आता तर सोशल मिडिया मुळे खूप कमी वेळात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात.

बॉलीवूड मध्ये आज अनेक सुपरस्टार आहेत. पण त्यांच्यात एक असा सुपरस्टार आहे की ज्याने कामाच्या बळावर अजूनही नाव प्रसिद्ध ठेवलेलं आहे. त्याचं नाव आहे. अजय देवगन. होय अजय देवगन ने आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे, ते सगळं लोकांमध्ये फार लोकप्रिय झालेलं आहे.

त्याचा नव्वदच्या दशकात आलेला फुल और काटे हा चित्रपट फार लोकप्रिय झाला होता. आज जरी लोकांनी पाहिला तरी लोकांना तो चित्रपट तेवढाच आवडतो. त्या चित्रपटामधील त्याचं आणि हिरोईनचं काम लोकांच्या मनात घर करून गेलं. आता तुम्हाला प्रश्न पडला ती हिरोईन कोण तर मधु शाह ही फुल और काटे मधील अजय देवगन ची पहिली हिरोईन. मधु शाह या अभिनेत्रीने तिच्या करियर मधील एका गोष्टीचा खुलासा केलेला आहे.

See also  हा अभिनेता आठवतोय का? इतका बदलला आहे अभिनेता फरदीन खान, चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

1531796723 phool

तिचं असं म्हणणं आहे की ती एक चित्रपट करत होती. ज्यामध्ये तिला चांगली भूमिका मिळाली होती. करियर उभं करायच्या काळात तिला हा सिनेमा मिळाला होता म्हणून तिही खुश होती. तिने चार दिवस त्या सिनेमाचं शूटिंग केलं.

पण तिला नंतर अचानक काहीच कारण नसताना त्या सिनेमामधून हाकलून देण्यात आलं. म्हणजे तिच्या जाग्यावर दुसऱ्या हिरोईन ला काम देण्यात आलं. हे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिला खूप मोठा ध-क्का बसला. आपली काहीही चूक असताना का काढलं गेलं ? हा प्रश्न तिच्या मनात सलत होता. डायरेक्टर ने या बाबत काहीच तिला कळवलं नाही. म्हणूनही ती फार दुखी झाली.

madhoo ajay devgn b

एका मुलाखतीत मधु शाह अशी म्हणाली की मला त्या फिल्म मधून ज्या प्रकारे काढण्यात आलं ते पाहून मी फार दुखी झाले होते. मला काहीच कळत नव्हतं. आतून बाहेरून सगळीकडून मी तुटले होते पार. माझे मीटर, घरचे सगळे या गोष्टी मुळे हैराण झाले होते. आज जरी मला ते कधी आठवलं तर तेवढाच त्रास होतो. जेवढं तेव्हा झाला होता.

See also  भारताच्या गानकोकिळा यांचा जीवनप्रवास थांबला, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फिल्मच्या टीमने मला न विचारता दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊन काम करायला सुरुवात केली. त्यांची जवाबदारी होती की मला काढण्याचे कारण सांगावं. ज्या दिवशी मला ही गोष्ट कळली त्या दिवशी मी रात्र भर खूप रडले. मला ही गोष्ट न्यूजपेपर मधून कळली. पण एवढं नक्की त्या घटनेनंतर मला खूप काही शिकायला मिळालं. तिथून पुढ मी अजून जोमाने काम करू लागली.

१९ फेब्रुवारी १९९९ ला मधु शाह यांनी आनंदी शह यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुली झाल्या. एकीच नाव अमेया आणि किया हे आहे. मुली झाल्यानंतर त्यांनी मोठ्या होईपर्यंत काम सोडल. पण आता तिने पुन्हा सिरीयल मधून काम करण सुरु केलं आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment