ग्रामीण भागातील ‘या’ इयत्तांचे वर्ग पुन्हा भरणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील ज्या ग्रामीण भागात  कोरोना हद्दपार झाला आहे अशा ठिकाणी आठवी ते बारावीचे (8th to 12th Class) वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केला आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. बरीच गावे पूर्णपणे कोरोनमुक्त झाली आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळांचे वर्ग सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र, वर्ग सुरू करण्यापूर्वि संबंधित गावातील ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे.

See also  अभिमानास्पद! नीरज चोप्राने रचला इतिहास, ऑलंपिकमध्ये १३ वर्षांनंतर भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक...

कोविड संबंधी नियमांचे करावे लागेल पालन

काही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी गावातील बरीच लोक कामकाजासाठी शहरात येत- जात असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने आदेशात कोविड संबंधी नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.

असे आहेत नियम

शाळांनी विद्यार्थ्यांना टप्या टप्याने बोलवावे लागणार आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थांना परवानगी असेल. एका बाकावर एक विद्यार्थी बसवण्यात येणार आहे.  दोन बाकामधील अंतर 6 फूट असणे बंधनकारक असेल. यासोबतच सतत साबणीने हात धुणे, मास्क घालणे इत्यादि कोविड प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.

संबंधित शाळेमधील शिक्षकांची राहण्याची सोय त्याच गावात करावी लागणार आहे किंवा त्या शिक्षकाने स्वतःच्या वाहनाने शाळेला यावे लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास त्या विद्यार्थ्याला घरी पाठवण्यात येणार असून त्याचची कोविड चाचणी  करण्यात येईल.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment