महाड येथील ग्रामस्थांनी केली मृतदेहांची शोध मोहीम थांबवण्याची विनंती, कारण ऐकून धक्का बसेल

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

महाड: राज्यात महापुराने हाहाकार माजवला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एक पूर्ण गाव नष्ट झाले. यात कमीत कमी 53 लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ संघ बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. मात्र घटना होऊन तीन दिवस झाले असताना गावकर्‍यांनी आता शोध मोहीम थांबवण्याची मागणी केली आहे.

मृतांना ढिगार्‍याखालीच सोडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जावेत, असे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तालीये गावात 11 मृतदेह सापडले आणि आणखी 31 लोक अजूनही ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूस्खलनात आपले आई-वडील गमावलेला स्थानिक रहिवासी किशोर पोळ म्हणाले की, “आता मृतदेह बाहेर काढण्यात येऊ नये, त्यांना मृत घोषित करावे.”

See also  सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने शेयर केली ही भावुक पोस्ट

सरपंचांनी घेतली बैठक…

इंग्रजी वृत्तपत्राने लिहीलेल्या वृत्तानुसार, गावचे सरपंच संपत चांडेकर यांनी याबाबत बोलताना सांगितले, ‘3 दिवसापासून पाऊस सुरू असून अनेक मृतदेह ढिगार्‍याखाली सडत आहेत. त्या स्थितीतील मृतदेहांना बाहेर काढताना पाहून कुटुंबातील व्यक्तींना आणि नातेवाईकांना वाईट वाटू शकते. त्यामुळे रविवारी आम्ही सर्वांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. यावर मृतक आणि बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईकांनी सहमती दर्शवली आहे.”

आमदारांनी दिली प्रतिक्रिया…

महाड शिवसेनेचे आमदार भरत गोगावले म्हणाले, आता तीन दिवस झाले असून मृतदेह कुजण्यास सुरूवात झाली आहे. मृतांचा आदर केला पाहिजे. गावकरी आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांना शोधमोहीम थांबवून त्यांना मृत घोषित करायचे आहे आणि दुर्घटनास्थळीच त्यांचे अंतिम संस्कार करायचे आहेत.

आमदार गोगावले पुढे म्हणाले, मी आणि सरपंच दोघांनी ग्रामस्थासोबत याविषयावर बोललो आहोत. सर्वांची हीच माणगी असून यावर कोणालाही आक्षेप नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकार्‍यांना कळविले असून अंत्यसंस्कार कसे करावे यावर चर्चा केली. शोधमोहीम करणार्‍या चमुला सुद्धा कोणीही जीवंत असण्याची शक्यता वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

See also  पूरग्रस्तांना पॅकेजसाठी अजूनही वाट पहावी लागणार, अजित पवारांनी केले स्पष्ट, जाणून घ्या कधी मिळेल पॅकेज?

कागदोपत्री कारवाई बाबत गावकरी चिंतीत…

तथापि, आवश्यक कागदाच्या कामांबद्दल नातेवाईक चिंतीत आहेत. किशोर पोळ म्हणाले, ‘आवश्यक कागदोपत्री कारवाई पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे. जेणेकरून सर्वांना मृतदेहांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळू शकेल.’ जिल्हा प्रशासनासाठी हा सोपा निर्णय नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment