जाणून घ्या महागौरी माताची माहित नसलेली अदभूत कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

देवी महागौरी माता : गौर या शब्दाचा अर्थ गोरा, शुभ्र. शुभ्र रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. देवी महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ आहे. माता गौरीला शिवाची अर्धागिनी आणि गणेशाच्या आईच्या रूपातदेखील ओळखले जाते. देवी महागौरी अमाप शक्ती आणि मनोवांच्छित फळ देणारी आहे. मनात असलेले सगळे किल्मिष तिच्यामुळे दूर होतात. देवी महागौरीच्या आराधनेने जीवनाबाबतचे उच्च ज्ञान मिळते, असे मानतात.

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे देवी महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो, असे मानतात. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. ही गोरेपणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांपासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षां भवेद् गौरी।’ तिचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. देवी महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्यावरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. देवी महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.

See also  आजची माता आहे सिद्धिदात्री माता, जाणून घ्या सिद्धिदात्री माताची कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्याअनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-जन्म कोटि लगि रगर हमारी। बरँ संभु न त रहँ कुँआरी॥ या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला देवी महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. देवी महागौरी भक्ताचे संकट दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते.

माता महागौरी पूजन विधी : नवरात्रींच्या अष्टमींच्या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व असते. या दिवशीची देवी गौरीची पूजा भक्तीने भरलेली असते. तिला पंचामृताने स्नान घालावं. या दिवशी कुमारिकांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे कमीत कमी नऊ मुलींना बोलावून त्यांची पूजा करावी, असे सांगितले जाते. या मुलींचे वय शक्यतो दोन ते दहा वर्षांच्या आतील असू द्यावे. त्यांना बसायला आसन देऊन पायांवर कूंकुवाने स्वस्तिक काढावे. नंतर त्यांना हळद-कुंकू लावावे. त्यांना एकतर जेवण किंवा खीर खाण्यास द्यावी.

See also  आजची नवदुर्गामाता आहे माता ब्रह्मचरिणी, जाणून घ्या माता ब्रह्मचरिणी व्रतकथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…

त्याचप्रमाणे काही दक्षिणा आणि शक्य असल्यास एखादी वस्तू देऊन त्यांचा नमस्कार करावा. देवी भागवत पुराणानुसार, कन्या पूजेमध्ये केवळ दोन वर्षांच्या मुली आणि दहा किंवा दहा वर्षांपेक्षा लहान मुलींचा समावेश करतात. तो एवढय़ासाठी की, दोन वर्षीय कन्या कुमारी, तीन वर्षीय कन्या त्रिमूर्ती, चार वर्षीय कन्या कल्याणी, पाच वर्षीय रोहिणी, सहा वर्षीय कलिका, सात वर्षीय चांदिका, आठ वर्षीय शंभवी, नऊ वर्षीय दुर्गा आणि दहा वर्षीय मुलगी सुभद्रा या रूपांमध्ये त्या असतात. कन्यांची पूजा करताना देवी या स्वरूपात असते म्हणून मुलींसाठी ही वर्ष नेमून दिली आहेत. तसेच मुलीसोबत सुवासिनींनादेखील हळदीकुंकूला बोलवून त्यांनादेखील यथोचित काही वाण द्यावे, अशी श्रद्धा आहे. या दिवशी देवीसमोर बसून पुढील स्तोत्राचे पठण करावे.

माता महागौरी स्तोत्र :

सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।
ज्ञानदा चतुर्वेदमयी देवी महागौरी प्रणमाभ्यहम्
सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।
डमरूवाद्य प्रिया अद्या देवी महागौरी प्रणमाभ्यहम्
त्रलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।
वददं चतन्यमयी देवी महागौरी प्रणमाम्यहम्।

माता महागौरी पूजन महत्त्व : असं मानतात की नवरात्रामध्ये कन्या पूजन केल्याशिवाय व्रत अपूर्ण राहते. शेवटच्या राहिलेल्या या दिवसात जे हे व्रत श्रद्धेने करतात त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. काही जण या नऊ मुलींसोबत काही ठिकाणी मुलांनादेखील जेवायला बोलावतात. माता देवी महागौरीच्या कृपेने साधकांना अलौकिक सिद्धी प्राप्त होते. माता भक्तांना दु:खापासून मुक्त करते. देवीच्या पूजेचे शुभ फल दररोज मिळते. या पूजेमुळे भक्तांचे पाप नष्ट होते.

See also  या हॉस्पिटलमध्ये झाला नवरात्रीचा चमत्कार, घटस्थापनेच्या दिवशी घडला हा चमत्कार, जाणून घ्या संपूर्ण बातमी...

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment