मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या श्री महालक्ष्मी व्रताचे महत्व तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या मुहूर्त, पूजन विधी, मंत्र…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरु होते. दिवाळीनंतर काहीसा थंडावलेला सण-उत्सवांचा माहोल यानिमित्ताने पुन्हा एकदा सुरु होतो. बहुतांश ठिकाणी स्त्रिया हे गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. यावेळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास करण्याची पद्धत आहे. तसेच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. आता हा महिना आणि त्यातही गुरुवार का महत्त्वाचे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उ’तू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.

आंब्याच्या डहाळय़ा, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापन केलेली मूर्ती, सजवून केलेली आरास, या व्रताचं महात्म्य वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रुप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात.

See also  हिवाळ्यात जन्मलेल्या बाळांसाठी हि नाव आहेत खूपच शुभ...

दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते. या महिन्यात मां’सा’हा’र व’र्ज्य केला जातो. मार्गशीर्षांतील गुरुवारची चाहुल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ आणि यानिमित्ताने घरी येणाऱ्या सुवासिनींसाठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून गेलेला दिसतो.

यंदा दि. १५ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिना सुरू होत असून दि. १७ डिसेंबर रोजी पहिला गुरुवार आहे.

मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार विशेष असतो. स्त्रिया कुटुंबासाठी सुख-समृद्धी, शांती, ऐश्वर्य प्राप्तीची कामना करत या दिवशी महालक्ष्मीचं व्रत करतात.
मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी शा’स्त्रो’क्त पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. उद्यापनाच्या दिवशी सवाष्ण स्त्रियांना बोलावून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. तर जाणून घ्या कशा प्रकारे करावी पूजा.

श्री महालक्ष्मी पूजन विधी:

 • पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
 • रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारीबाजूला रांगोळी काढावी.
 • चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावर तांब्याचा कळश ठेवावा.
 • कळशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे.
 • कळशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी
See also  पापमोचनी एकादशीचा अद्भुत योगायोग, जाणून घ्या या तिथीचे धार्मिक महत्व, शुभमुहूर्त व पूजाविधी सविस्तर...

 

 • वि’ड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा.
 • चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
 • त्यापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
 • लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
 • लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.

 

 • देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.
 • लक्ष्मी पूजनानंतर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी.
 • श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे.
 • यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा.
 • मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी.

 

 • संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे.
 • गायीसाठी एक पान वेगळं काढावे.
 • नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.
 • दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिं’प’डा’वे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे. पाने घरातील चो’र बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टा’का’वे.
 • शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा स’त्का’र करावा.

।। श्री महालक्ष्मी मंत्र।।

श्री गणेशाय नम: । श्री महालक्ष्मी देव्यै नम: । ॐ श्रीं क्लृं ओम धनद धनं देहिमाम्‌ ।
ॐ धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्मादिपायच । भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपद: ॥

।।श्री महालक्ष्मी नमनाष्टक।।

श्रीगणेशाय नमः
इंद्र उवाच –

नमस्तेस्तु महामाये, श्रीपीठे सुरपूजिते |
शंखचक्रगदाहस्ते, महालक्ष्मी नमोस्तु ते || १ ||

नमस्ते गरुडारूढे, कोलासुरभयंकरी |
सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते || २ ||

सर्वज्ञे, सर्ववरदे, सर्वदुष्टभयंकरी |
सर्वदु:खहरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते || ३ ||

सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी |
मंत्रमूर्ते सदा देवी, महालक्ष्मी नमोस्तु ते || ४ ||

आद्यन्तरहिते देवी, आद्यशक्ति महेश्वरी |
योगज्ञे योगसंभूते, महालक्ष्मी नमोस्तु ते || ५ ||

स्थूलसुक्ष्महारौद्रे महाशक्ते महोदरे |
महापापहरे देवी, महालक्ष्मी नमोस्तु ते || ६ ||

पद्मासनस्थिते देवी, परब्रह्मस्वरूपिणी |
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तु ते || ७ ||

श्वेताम्बरधरे देवी, नानालंकारभूषिते |
जगतस्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तु ते || ८ ||

फलश्रृति –

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः |
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा || १ ||

एककाले पठेन्नित्यं महापाप विनाशनं |
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यं समन्वितः || २ ||

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रु विनाशनं |
महालक्ष्मीर्भ्हवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा || ३ ||

टीप :
वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

See also  कारगिल यु'द्धातील ' या ' खऱ्या लढवय्या वीरांना पाकिस्तानी लोक सुद्धा म्हणायचे 'शेरशाह'
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment