धनवर्षाव करुन गजांतलक्ष्मी प्रदान करणारे “श्रीमहालक्ष्मी व्रत”, शास्त्रानुसार महत्व, शुभ मुहूर्त, पूजनविधी आणि कथा सर्व जाणून घ्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

श्रीमहालक्ष्मी व्रताचे महत्व: श्रीमहालक्ष्मी व्रताचा प्रारंभ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीला होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला समाप्ती होते. या व्रतामध्ये देवी लक्ष्मीची “श्रीमहालक्ष्मी व्रत” करून मनोभावे पूजा केली जाते. हे व्रत सोळा दिवस ठेवले जाते.

ज्यामध्ये देवी श्रीमहालक्ष्मीची सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळेस पूजा करून आणि चंद्राला अर्ध्य अर्पण करणे आवश्यक आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार जो कोणी हे महालक्ष्मी व्रत ठेवतो त्याला श्रीमहालक्ष्मी कृपेने आयुष्यात धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य, कीर्ती, मानमरातब, पुत्रपौत्रांचे कौटुंबिक सुख, नोकरी-व्यवसायात प्रगती आदि. सर्वसुखें प्राप्त होतात.

श्रीमहालक्ष्मी व्रताचा मुहूर्त: या वर्षी हे धनफलदायी “श्रीमहालक्ष्मी व्रत” दि. २५ ऑगस्ट (अष्टमी: २५ ऑगस्ट रात्री १२.२१ ते २६ ऑगस्ट सकाळी १०.३९, चंद्र उदय वेळ – रात्री १२.२३) रोजी प्रारंभ होऊन १६ दिवसांच्या उपवासानंतर दि. १० सप्टेंबर २०२० या कालावधीत संपन्न होणार आहे.

श्रीमहालक्ष्मी व्रत पूजन विधी :

  • श्रीमहालक्ष्मी व्रताचे पालन करणाऱ्या साधकाने पहाटे उठून स्नानादि नित्यकर्मे उरकून लाल वस्त्रे धारण करावीत.
  • पाट चौरंग आंब्याच्या पानांनी सजवून घराच्या ईशान्य वा पूर्वोत्तर भागात पूजस्थान तयार करावे.
  • पुजास्थानी केशरमिश्रित चंदनाने अष्टदल काढून त्यावर तांदूळ आणि तांदळावर मंगलकलश ठेवावा.
  • पूजस्थानी हळदीने कमळ काढून त्यावर श्रीमहालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
  • श्रीमहालक्ष्मीची मूर्ती स्थापित झाल्यानंतर आपल्या मनगटावर १६ गाठी मारलेला हळदीचा पिवळा धागा (रक्षासूत्र) बांधावा. (व्रताच्या १६ व्या दिवसाची पूजा केल्यावर हे रक्षासूत्र नदी किंवा तलावामध्ये विसर्जित करावे).
  • श्रीमहालक्ष्मीला पुष्पहार, नैवद्य, अक्षता, सोने किंवा चांदी (अशी मान्यता आहे की, या दिवशी खरेदी केलेले सोने आठ पटींनी वाढते.) अशा सर्व गोष्टी अर्पण करा.
  • या सर्व गोष्टी केल्यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका.
  • त्यानंतर माता श्रीमहालक्ष्मीची आरती करुन खिरीचा नैवैद्य अर्पण करा.
See also  क्रिकेटर नव्हे, तर 'या' घटस्फोटित व्यक्तीशी लग्नबंधनात अडकणार अनुष्का शेट्टी!

संध्याकाळीही भक्तिभावाने पूजा करावी. पूजेनंतर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी घराबाहेर दिवा लावा आणि संध्याकाळच्या पूजेनंतर चंद्राला अर्ध्य द्या.

श्रीमहालक्ष्मीच्या उपासनेत दररोज देवी श्रीमहालक्ष्मीच्या खालील आठ नावांचा जप करावा.

mantra

जर एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव सोळा दिवस सलग उपवास करणे अशक्य असेल तर ती व्यक्ती पहिल्या, आठव्या आणि सोळाव्या उपवास करुनही हे व्रत करू शकते. महालक्ष्मी व्रत उद्यापन सोळाव्या दिवशी करतात.

महालक्ष्मी व्रत कथा: पहिली कथा :पौराणिक कथेनुसार एका गावात एक गरीब ब्राम्हण रहायचा. ते ब्राह्मण भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने तो भगवान श्रीविष्णूंची उपासना करत असे. भगवान विष्णू एकदा या भक्तावर खूप प्रसन्न झाले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झाल्यावर भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले.

त्या ब्राह्मणाने भगवान विष्णूला “माझ्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य असावे” अशी इच्छा व्यक्त केली. या भक्ताचे मागणे ऐकून भगवान विष्णूने त्यांना लक्ष्मीची प्राप्ती करण्याचा मार्ग सांगितला. विष्णूजी म्हणाले की, दररोज मंदिरासमोर एक महिला येते, आणि गोवऱ्या थापते. तुम्ही जा आणि त्या महिलेला आपल्या घरी येण्यास आमंत्रित करा. ती महिला इतर कोणी नाही तर देवी लक्ष्मी आहे.

See also  अभिनेते नाना पाटेकर या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

जर ती महिला तुमच्या घरी आली तर तुमचे घर धनधान्याने भरून जाईल. असा वर देऊन भगवान विष्णू अंतर्धान पावले. यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता ब्राह्मण मंदिराच्या दाराजवळ बसला. एका महिला येऊन तिथे गोवऱ्या थापू लागली. त्या ब्राह्मणाने त्या महिलेला विष्णूने सांगितल्याप्रमाणे तिच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.

जेव्हा ब्राह्मणने माता लक्ष्मीला घरी येण्यास सांगितले तेव्हा तिला समजले की भगवान विष्णूने त्याला तसे करण्यास सांगितले असणार. यानंतर लक्ष्मी म्हणाली की, “तुम्ही महालक्ष्मी व्रत करा, हे व्रत १६ दिवस करून १६ रात्री चंद्राची पूजा करून अर्ध्य द्या. असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

त्या ब्राम्हणाने माता लक्ष्मीच्या निर्देशानुसार श्रीमहालक्ष्मीचे व्रत व उपवास केला आणि लक्ष्मीजींना उत्तरेकडे मुख करुन आमंत्रण केले, त्यानंतर श्रीमहालक्ष्मीनेही त्या ब्राम्हणाच्या घरी निवास करून तिचे वचन पूर्ण केले.

दुसरी कथा- एकदा श्रीमहालक्ष्मीचा सण आला. हस्तिनापुरात, गांधारीने शहरातील सर्व महिलांना पूजेसाठी आमंत्रित केले, पण कुंतीला काही सांगितले नाही. गांधारीच्या १०० पुत्रांनी भरपूर माती आणली आणि तिच्यापासून प्रचंड मोठा हत्ती तयार केला. त्याला सुवर्ण अलंकारांनी सुशोभित करून राजवाड्याच्या मध्यभागी ठेवला. . सर्व बायकां पूजेची ताटं घेऊन गांधारीच्या राजवाड्यात जाऊ लागल्या.

यावर कुंती खूप दु:खी झाली. जेव्हा पांडवांनी तिला कारण विचारले, तेव्हा तिने घडलेली गोष्ट कथन केली. ती म्हणाली की, मी माझे व्रत कसे पूर्ण करु? हत्ती तर नाहीय. त्यावर अर्जुन म्हणाला आई! तू पूजेची तयारी कर, मी जिवंत हत्ती तुझ्याकडे आणतो. अर्जुन थेट इंद्राकडे गेला. आईच्या श्रीमहालक्ष्मी व्रतासाठी तो साक्षात इंद्राच्या लाडक्या वाहनाला, ऐरावत हत्तीलाच घेऊन आला. कुंती मातेने ऐरावताची मनोभावे पूजा केली.

See also  बाहुबली फेम भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा दिग्गुबाती याचा विवाहसोहळा संपन्न; त्याची पत्नी दिसते खूपच सुंदर...

सर्व नगरवसीयांना कळले की, साक्षात इंद्राचा ऐरावत हत्ती कुंतीच्या महाली आला आहे. आणि मग काय, सर्वजण कुंतीच्या महालाच्या दिशेने धावत सुटले आणि सर्वांनी त्या ऐरावताची मनोभावे पूजा केली.

“श्रीमहालक्ष्मी” आरती –

ॐ जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता।
तुमको निशिदिन सेवत, हरि विष्णु विधाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

उमा, रमा, ब्रह्माणी, तुम ही जग-माता।
सूर्य-चन्द्रमा ध्यावत, नारद ऋषि गाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

दुर्गा रुप निरंजनी, सुख सम्पत्ति दाता।
जो कोई तुमको ध्यावत, ऋद्धि-सिद्धि धन पाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

तुम पाताल-निवासिनि, तुम ही शुभदाता।
कर्म-प्रभाव-प्रकाशिनी, भवनिधि की त्राता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

जिस घर में तुम रहतीं, सब सद्गुण आता।
सब सम्भव हो जाता, मन नहीं घबराता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

तुम बिन यज्ञ न होते, वस्त्र न कोई पाता।
खान-पान का वैभव, सब तुमसे आता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

शुभ-गुण मन्दिर सुन्दर, क्षीरोदधि-जाता।
रत्न चतुर्दश तुम बिन, कोई नहीं पाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

महालक्ष्मीजी की आरती, जो कोई जन गाता।
उर आनन्द समाता, पाप उतर जाता॥
ॐ जय लक्ष्मी माता॥

“माता श्रीमहालक्ष्मी” आपणां सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो.
शुभं भवतु:!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment