बुलेट ट्रॅक्टर – महाराष्ट्रातील युवा शेतकऱ्याची अनोखी निर्मिती, फक्त 8 दिवसात बुलेट ट्रॅक्टर रेडी, किंमत आहे फक्त…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा परिसरातील रहिवासी असलेला एक सामान्य शेतकरी मकबूल शेख जो आपल्या तीन एकर जागेवर शेती करतो. पाण्याच्या स’म’स्ये’मुळे ४३ वर्षीय मकबूलने आपल्या बैलांची विक्री केली. यानंतर त्याला शेतात काम करणे अधिक कठीण झाले. हरहुन्नरी मकबूलने ही समस्या मात्र संधी म्हणून घेतली. त्याला एक उपाय सापडला जो केवळ त्याच्यासाठीच नाही तर शेकडो शेतकऱ्यांनाही देखील उपयुक्त आहे.

Bullet Tractor.jpg?format=webp&compress=true&quality=90&w=1200&dpr=1

Advertisement

मकबूलने शेतीसाठी खास प्रकारचे ट्रॅक्टर (बुलेट ट्रॅक्टर) बनविला, ज्याचे निर्मितीमूल्य बाजारात उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरपेक्षा दहापट कमी आहे. त्याचा हा शोध इतका झपाट्याने प्रसिद्ध झाला आहे की आतापर्यंत त्याच्या भागातील १४० शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून हे ट्रॅक्टर बनवून घेऊन खरेदी केले आहे. मकबुलच्या या अविष्कारासाठी त्याला महाराष्ट्र सरकारने ‘कृषी रत्न पुरस्कार’ देऊन गौरविले आहे. याव्यतिरिक्त, त्याला ‘यंग ऍग्रीकल्चरल मॉडिफायर अवॉर्ड’ देखील मिळाले आहे.

See also  स्वप्नात जर या ४ गोष्टी दिसत असतील तर समजून घ्या आपले चांगले दिवस लवकरच सुरु होणार आहेत...

सामान्य शेतकऱ्यांसाठी आता बुलेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती समृद्ध करण्याचं अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न असतं, मात्र हे स्वप्न पैशांअभावी साकार होत नाही. अशा सामान्य शेतकऱ्यांसाठी आता बुलेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. हा छोटा बाईक ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीची सर्व कामे करतो.

Advertisement

whatsapp image 2021 02 19 at 17.18.18 202102564869

अगदी दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढतो. लातूरच्या निलंगा शहरात मकबूल शेख यांचं शेती अवजारांचं वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारा बुलेट ट्रॅक्टर तयार झालाय. यासाठी मकबूल यांना एक ट्रॅक्टर बनवायला साधारण ८ दिवस जातात. १ लाख ६० हजारात सामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला उपलब्ध होणारा हा ट्रॅक्टर पेरणी, कोळपणी, फवारणी, नांगरणी याबरोबरच शेतातली सगळी कामं सहजपणे करतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या बुलेट ट्रॅक्टरचे सर्व पार्ट खोलून दुरुस्त करता येणार आहेत. एव्हढ्या सोप्या पद्धतीने हा ट्रॅक्टर बनवला आहे. यामध्ये क्रॉम्प्टन ग्रिव्हीज कंपनीचे इंजिन वापरण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर १० आणि ५ एचपीमध्ये उपलब्ध आहे.

See also  सर्व स्त्रिया आपल्या पतीपासून लपवतात या ८ गोष्टी, ऐकून विश्वासच बसणार नाही!
Advertisement

whatsapp image 2021 02 19 at 17.18.07 202102564872

आता या व्यवसायाला मकबूल शेख व्यवसायिक स्वरूप देण्याच्या तयारीत आहेत. लातूरच्या ग्रामीण भागातल्या एका युवक व्यावसायिकाने बनवलेला हा ट्रॅक्टर अल्पावधीत राज्यासह कर्नाटक आणि मध्यप्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होतो आहे. नेपाळमधल्या काही शेतकऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधून नोंदणीही केली. त्यामुळे भविष्यात हा बुलेट ट्रॅक्टर सामान्य शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा ठरू शकतो.

Advertisement

whatsapp image 2021 02 19 at 17.18.50 202102564874

मकबुलला त्याच्या मोठ्या भावाच्या मन्सूरभाईच्या ट्रॅक्टरच्या वर्कशॉपमध्ये ट्रॅक्टर संबंधित कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. “लहानपणापासूनच मी माझा मोठा भाऊ मन्सूरबरोबर मेकॅनिक म्हणून काम केले आहे. मी दुरुस्ती व देखभाल संबंधित सर्व कामे करायचो. परंतु काही वर्षांपूर्वी, त्यांच्या निधनानंतर, मी शेती व वर्कशॉपची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. मला आनंद आहे की शेती सुलभ आणि स्वस्त करून मी लोकांचे जीवन बदलू शकलो. भविष्यातही मी अशाच चांगल्या गोष्टी करत राहू इच्छितो.” असेही मकबूल आवर्जून सांगतो.

See also  'त्या' ख'त'र'ना'क नरभ'क्ष'क बिबट्याला टिपणारा शू'ट'र म्हणतो..."तर आज मी तुमच्या समोर नसतो!"
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close