महाराष्ट्राला दरमहा कोरोना लसीच्या तब्बल ‘एवढ्या’ कोटी डोसची आवश्यकता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई: देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी प्रतिदिन 40 हजार पेक्षा जास्त नवीन रुग्ण सापडत आहेत. त्याचप्रमाणे राज्यातही 8 हजार पेक्षा जास्त नवीन रुग्ण दररोज सापडत असून, तिसर्‍या लाटेचीही चिंता वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या बरेच निर्बंध लावलेले आहेत. मात्र, कोरोनाला पुर्णपणे रोखायचे असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही असे तज्ञांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, लोकसंख्या जास्त असल्यामुळे लसीकरणासाठी पर्याप्त पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा कमी वेगाने लसीकरण सुरू आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या पुरवठ्याबाबत बोलताना सांगितले की, “कोरोनापासून बचाव करण्याकरिता राज्यातील सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी राज्याला दरमहा तब्बल 3 कोटी लसीच्या डोसची गरज आहे.” ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

See also  नाशिक करंसी नोट प्रेस मध्ये कोणी चोरी केली? झाला खुलासा, ऐकून धक्का बसेल

क्षमता 15 लाखांची पण रोज 3 लाख लोकांचेच लसीकरण होत आहे.

महाराष्ट्र राज्याची दररोज 15 लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे, परंतु लसीच्या कमतरेतेमुळे रोज फक्त 3 लाख लोकांचेच लसीकरण होत आहे.  आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, “3 दिवसांपूर्वी आम्हाला 7 लाख डोस मिळाले होते. आज दिवस पूर्ण होईपर्यंत ते पण संपतील. आतापर्यंत आम्हाला 3.60 कोटी लसीचे डोस मिळाले आहेत. त्यापैकी 25 लाख डोस राज्य सरकारने थेट विकत घेतलेले आहेत.”

क्षमतेपेक्षा कमी काम करावे लागत आहे

अधिकृत आकड्यांनुसार रविवार 11 जून पर्यंत राज्यात 3,65,25,990 लसीचे डोस देण्यात आले आहेत. राज्यातील लसीच्या तुटवड्याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “आम्हाला आमच्या क्षमतेपेक्षा कमी काम करावे लागत आहे. राज्यातील पूर्ण जनतेचे लसीकरण लवकर करायचे असेल तर केंद्राने लस पुरवठा वाढवण्याची गरज आहे.”

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment