मोठा निर्णय: आता ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारवीचे निकाल मूल्यांकन पद्धतीने घोषित करणार असल्याचे  जाहीर केले होते. 15 जुलै रोजी दहावीचे निकाल जाहीर होणार होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे निकाल पुढे ढकलण्यात आला होता.

विद्यार्थ्यांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही…

दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जास्त लांबणीवर न टाकण्याचा निर्णय झाला आहे. दहावीचा निकाल 15 जुलै ऐवजी फक्त एक दिवस उशिरा म्हणजे 16 जुलै रोजी दुपारी एका वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सर्व शाळांतील दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. याबाबत ट्विट करत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

दहावीच्या  परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यावेळी निकाल मूल्यांकन पद्धतीनुसार लावण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास 15 लाख 92 हजार विद्यार्थ्यांचे गुण कम्प्युटर सिस्टम मध्ये अपलोड करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांचेही गुण आज सायंकाळपर्यंत अपलोड होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

See also  ‘लगान’ चित्रपटातील या अभिनेत्यावर पत्नीचा गंभीर आरोप, माझ्या नवऱ्याचं या अभिनेत्री सोबत अफेअर होतं...

कुठे पाहता येणार निकाल…

दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता www.mahresult.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment