“महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर” च्या स्पर्धकाला प्रसिद्ध मराठी उद्योजक प्रेक्षकाने दिलीय नोकरी, पण ठेवलीय ही भन्नाट अट…

तुफान लोकप्रिय झालेला डान्स शो ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. सोनी टीव्ही मराठीवरील डान्स शो ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. प्रथमेश मानेने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, या भागात अधिक चर्चेत आला तो लातूरचा स्पर्धक दीपक हुलसुरे. अतिसामान्य कुटुंबातून आपल्या कलेच्या जोरावर पुढे आलेल्या दीपकचा या मंचापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर होता. मात्र, याच मंचावर त्याचे नशीब फळफळले आहे. त्याला त्याच्या एका चाहत्याने चक्क मोठे सरप्राईज दिले.

ezgif 6 ca640400e914

महाअंतिम सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या दीपकच्या एका चाहत्याने त्याला स्वतःच्या कंपनीत मोठ्या हुद्द्याची नोकरी देऊ केली आहे. प्रेक्षक म्हणून सहभागी झालेले सुप्रसिद्ध मराठमोळे उद्योजक श्री. अशोक खाडे यांनी दीपकला आपल्या कंपनीत ‘चीफ सिक्युरिटी ऑफिसर’ ही पोस्ट देऊ केली आहे. इतकेच नाही तर, यासाठी काही भन्नाट अटी देखील त्यांनी ठेवल्या आहेत.

कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेले अशोक खाडे म्हणाले, ‘मी माझगाव डॉकमध्ये १५ वर्षे नोकरी केली. या काळात एकदा मी जर्मनीला गेलो. तिथून पुन्हा आल्यावर मी नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय सुरु केला. जेव्हा दीपकला मंचावर पाहिलं तेव्हा असं वाटलं की, ही माझी तर माझ्याचसारखी गरिबी आहे. म्हणून आता मी असं ठरवलंय की, दीपकला मी माझ्या कंपनीत नोकरी देणार.’

पुढे ते म्हणतात, ‘दीपक माझ्या कंपनीत चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करेल. त्याच्या पगारातील १५ हजार रुपये मी त्याच्या आई-वडिलांना पाठवणार, १० हजार त्याला स्वतःच्या खर्चाला देणार. या दरम्यान त्याने मनसोक्त त्याची कला जपावी, बाहेरगावी जाऊन शो करावे.

त्याला लागतील तितके पैसे मी द्यायला तयार आहे. पण यासाठी अट एकच की, दीपकने महिन्यातून किमान चार दिवस कंपनीत येऊन माझ्यासोबत चहा प्यायचा!’ अशोक खाडे यांचे बोलणे ऐकून दीपकसहीत मंचावर उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात अ’श्रू त’र’ळ’ले.

ezgif 6 f19532de96e8

लातूरच्या जगलपूर भागात एका गरीब कुटुंबात दीपकचा जन्म झाला. पहिल्यापासूनच त्याला नृत्याची आणि स्टंट करण्याची आवड होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला नृत्याचे शिक्षण घेता आले नाही. मात्र, पुढे लातूर शहरामध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्याने अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये बाग घेऊन आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. अशाच एका कार्यक्रमात त्याने एका मुलाला बॅक फ्लिप मारताना पहिले आणि घरी आल्यानंतर त्याने शेतीची कामं करता करता ही फ्लिप शिकण्यास सुरुवात केली.

यामध्ये त्याला बरीच दु’खा’प’त’ही झाली. मात्र, पठ्ठ्याने त्याची जिद्द पूर्ण केली. घरात सुरुवातीपासून टीव्ही नव्हताच, त्यामुळे असे कोणतेही कार्यक्रम त्याला बघता यायचे नाहीत. मात्र, महाविद्यालयात गेल्यावर वडिलांनी त्याला एक मोबाईल घेऊन दिला. दीपक त्याच्यावर व्हिडीओ पाहून नृत्य शिकू लागला. घरची जबाबदारी सांभाळत त्याने आपली कला देखील जोपासण्यास सुरुवात केली.

याच कलेच्या आधारावर दोन पैशे देखील त्याला मिळू लागले. पुढे त्याने अशा नृत्यावर आधारित कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे ठरवले. ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’च्या माध्यमातून तो आणि त्याची ही संघर्ष कथा घराघरांत पोहचली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment