MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी हे मृ’त्यूपश्चात सोडून गेले करोडोंची प्रॉपर्टी, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

धर्मपाल गुलाटी यांचा चेहरा सर्वांच्याच ओळखीचा असेल. बरोबर! आम्ही बोलतोय ते एमडीएच या कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांच्याबाबतच. आय आय एफ एल हुरून इंडिया रिच २०२० च्या यादीत सामील असलेले ते सर्वात वयस्कर भारतीय श्रीमंत व्यक्ती होते.

आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.

Advertisement

आज पहाटे त्यांचं हृदय बंद पडल्यानं नि’ध’न झालं. एकेकाळी त्यांच्याकडे १ हजार ५०० रूपये होते. परंतु आज ते तब्बल ५ हजार ४०० कोटी रूपयांचे मालक आहेत. त्यांना वार्षिक २५ कोटी रूपयांचं वेतन मिळत होतं. गुलाटी यांचं वेतन अन्य कोणत्या एफएमजीसी कंपनीच्या सीईओंच्या तुलनेत अधिक होतं.

See also  या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला झालीय को-रो-नाची लागण, ट्विटर वर स्वतः पोस्ट करुन दिली चाहत्यांना माहिती...
Advertisement

गुलाटी यांना यापूर्वी पद्मभूषण या पुरस्कारनंही सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु त्यांचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. महाशियन दी हट्टी (एमडीएच) कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी हे विभाजनानंतर आपल्या कुटुंबीयांसह भारतात आले.

mdh

Advertisement

दिल्लीत आल्यानंतर त्यांना टांगा चालवणं सुरू केले. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी १५०० रूपयापैकी ६५० रूपयांमध्ये एक टांगा आणि घोडा खरेदी केला. तसंच स्टेशन परिसरात ते टांगा चालवू लागले. परंतु काही दिवसांनी त्यांनी आपल्या भावाला टांगा देऊन करोलबाग परिसरातील अजमल खां रोडवर मसाले विकण्यास सुरूवात केली. जसजसं त्यांच्या मसाल्याबद्दल समजत गेलं तसा त्यांचा व्यवसाय वाढत गेला.

गुलाटी यांनी आपली सर्वात पहिली कंपनी १९५९ मध्ये दिल्लीतील किर्तीनगर परिसरात सुरू केली. त्यानंतर अजमल खां रोडवर त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली. ६० च्या दशकात एमडीएचचं करोल बाग परिसरातील दुकानानं प्रसिद्धी मिळवली होती. कालांतरानं त्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचे मसाले पोहोचले आहेत.

See also  बुलेट ट्रॅक्टर - महाराष्ट्रातील युवा शेतकऱ्याची अनोखी निर्मिती, फक्त 8 दिवसात बुलेट ट्रॅक्टर रेडी, किंमत आहे फक्त…
Advertisement

baisakhi di raat 2013 6

५ हजार ४०० कोटी रूपयांच्या संपत्तीसह आयआयएफएलच्या यादीत ते २१६ व्या स्थानावर होते. तसंच यूरॉमॉनिटरनुसार ते एफएमजीसी क्षेत्रात सर्वाधित वेतन घेणारे सीईओ होते. गुलाटी यांचं वेतन २५ कोटी रूपये होतं. वयोमानानुसार ते आजही सर्वात जास्त सक्रिय होते. गुलाटी हे स्वत: आपली कंपनी, डिलर आणि बाजारात जात असत. एमडीएच हा मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रॅन्डपैकी एक आहे. तसंच त्यांच्या कंपनीत ५० निरनिराळ्या मसाल्यांचं उत्पादन केलं जातं.

Advertisement

एमडीएचचं आज केवळ भारतातच नाही तर दुबई आणि लंडनमध्येही कार्यालयं आहेत. एमडीएच आज सामाजिक कार्यांमध्ये पुढे आहे. कंपनीद्वारे महाशय चुन्नीलास ट्रस्टचं संचालन केलं जात असून २५० बेड्सचं एक रुग्णालयदेखील चालवलं जातं. याव्यतिरिक्त त्यांचं एक मोबाईल रुग्णालयदेखील आहे. झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाना याद्वारे आरोग्यसेवा दिली जाते. याव्यतिरिक्त त्यांच्या ट्रस्टच्या चार शाळाही आहेत. तसंच गरजू लोकांनाही मदत केली जाते.

See also  अवघ्या 22 दिवसांच्या मुलीला कुशीत घेऊन ऑफीसवर रुजू झालेल्या "या" महिला IAS अधिकाऱ्यावर होतोय कौतुकाचा वर्षांव...

Mahashay Dharampal Gulati Honoured With Padma Shri By Ram Nath Kovind

Advertisement

गुलाटी यांच्या नि’ध’नामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची भावना समाज माध्यमांवर उमटत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close