महाशिवरात्रीचा सूर्य नक्षत्र बदल, 9 राशींना लाभदायक तर या 3 राशींना ठरणार त्रासदायक, सावधगिरी बाळगा…

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, सूर्यग्रह हा गुरुवार दि. ११ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या सायंकाळी ६:०० वाजता पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर तिथे १७ मार्च २०२१ रोजी दुपारी २:२१ पर्यंत येथे राहील. सूर्य ग्रहाच्या बदलामुळे सर्वच राशींवर शुभ व अशुभ प्रभाव पडतील, यात शंकाच नाही. या सूर्य नक्षत्र बदलाचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल हे जाणून घेऊया.
सर्वप्रथम जाणून घेऊ या हा बदल लाभदायक ठरणाऱ्या ९ भाग्यवान राशी.

मेष:
या राशीच्या लोकांना सूर्य ग्रहाच्या बदलामुळे फायदा होईल. आपल्याला परिश्रमाचे संपूर्ण फळं मिळतील. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रयत्न कराल त्या क्षेत्रात तुम्ही चांगले काम कराल. नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळू शकते. अचानक संपत्ती मिळण्याचे योग दिसून येताहेत. कामात सतत प्रगती होईल. आरोग्य चांगले राहील.

कर्क:
या राशीच्या लोकांच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील. आपण आपल्या योजना पूर्ण कराल. कौटुंबिक आनंद वाढेल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायाशी संबंधित नवीन योजना फायद्याच्या ठरतील. दिलेल्या कर्जाचे पैसे परत मिळवू शकता. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही चांगले काम कराल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.

सिंह:
सूर्य ग्रहाच्या नक्षत्र बदलमुळे सिंह राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात फायदा होईल. प्रमोशनचे मार्ग खुले होतील. आपले कामाच्या ठिकाणी वर्चस्व असेल. प्रॉपर्टीशी संबंधित पूर्वी रखडलेली कामे पूर्ण कराल. मातेचे आरोग्य सुधारेल. घर आणि कुटुंबातील लोक आपले समर्थन करतील. सामाजिक स्तरावर मन मरातब वाढेल. प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढेल.

READ  भगवान श्रीशिवशंकरांची या 6 राशींवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…

कन्या:
या राशीच्या लोकांसाठी सूर्य ग्रह नक्षत्रबदल शुभ राहील. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत नशिबाचे पूर्ण सहकार्य लाभेल. विदेशातून चांगली बातमी मिळू शकते. तुमची मेहनत फलदायी होईल. तटलेले पैसे परत मिळतील. नवीन काम सुरू करा. मित्रमंडळींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदारासह प्रवास योजना आखाल.

वृश्चिक:
या राशीच्या लोकांना सूर्य नक्षत्र बदलामुळे नोकरीच्या क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कठोर परिश्रमाने सर्व कार्ये पूर्ण कराल. आपल्या मधुर वाणीने लोकांना प्रभावित कराल. भविष्यासाठी संपत्ती संचय करण्यात यशस्वी व्हाल. सुरू असलेले कौटुंबिक मतभेद संपतील. आपली एखादी मोठी योजना पूर्ण होऊ शकते.सामाजिक क्षेत्रातील मानसन्मान वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गोडी असेल.

धनु:
या राशीच्या लोकांसाठी, सूर्य ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन चांगले असेल. तुम्ही तुमच्या हितशत्रूंचा पराभव कराल. आपण भागीदारीत नवीन कार्य सुरू कराल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. प्रेम, जिव्हाळ्याचे संबंध दृढ होतील. जेष्ठांचे आरोग्य सुधारेल. इच्छुकांना चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायात भाग्यवृद्धी होऊन आपण यशस्वी व्हाल.

READ  श्री खंडेराया करणार कायापालट या 7 राशींचा, आर्थिक चिंतेतून मिळणार मुक्ती आणि करणार मालामाल…

मकर:
राशीच्या लोकांवर सूर्याच्या नक्षत्रातील बदलाचा चांगला परिणाम दिसून येईल. आपल्या सर्व योजना पूर्ण होतील. नोकरी व व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. वजनदार, प्रभावशाली लोकांशी संबंध जुळतील. आपण प्रवासाला जाऊ शकता. संततीचे आरोग्य सुधारेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. सर्व कार्यात यशस्वी होऊन सामाजिक मानसन्मान वाढेल.

कुंभ:
कुंभेची मानसिक चिंता कमी होईल. सूर्य नक्षत्र बदलामुळे स्थावर मालमत्ता संबंधित योजनांमध्ये चांगला फायदा होईल. आपण एखाद्या गरजवंताला मदत कराल. तुमची सर्व कामे तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील. भावंडांमधील चालू असलेले मतभेद संपतील. कौटुंबिक सौख्य मिळेल. आर्थिक गुंतवणूकीतुन तुम्हाला फायदा होईल.

मीन:
या राशीच्या लोकांसाठी, सूर्य नक्षत्र बदल शुभफलदायी होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. रखडलेले पैसे परत मिळतील. सगळ्या बाबतीत नशिबाची भरपूर साथ मिळेल. केलेल्या परिश्रमाचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबर उत्तम समन्वय राहील. प्रेमीजनांना काही रोमँटिक क्षण एकत्र घालविण्याची संधी मिळेल.

या ३ राशींच्या लोकांच्या समस्या वाढतील. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगावी असा ग्रहांचा सल्ला आहे.
वृषभ :
या राशीच्या लोकांना सूर्याचे नक्षत्र बदलल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या, भावंडांच्या आरोग्याबद्दल चिंता सातवेल. आर्थिक परिस्थिती ठीक असेल, परंतु आपल्या उत्पन्नानुसार खर्चांवर मात्र कंट्रोल व लक्ष ठेवा. अचानक पैसे खर्च होऊ शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल पती-पत्नीमध्ये मतभेद, विवाद घडू शकतात. आपल्याला कुसंगती टाळावी लागेल, अन्यथा मन-सामाजिक अपमान, मानभंगाचे प्रसंग उद्भवू शकतात.सन्मानाचे नुकसान होऊ शकते. वैवाहिक व प्रेम जीवनात नरम गरम वातावरण असेल.

READ  श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 5 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…

मिथुन:
या राशीच्या लोकांना सूर्य ग्रहाच्या नक्षत्र बदलामुळे आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. अकारण, अनावश्यक खर्च वाढू शकतो. उत्पन्न कमी होईल. आरोग्यहानी होईल. वाहन चालवताना अपघात होऊन तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. किरकोळ कामासाठी अधिक धावपळ होईल. कठोर परिश्रमानुसार तुम्हाला फळ मिळणार नाही, यामुळे तुमचे मन निराश होईल. संततीशी वाद झाल्यास महागात पडेल.

तूळ:
या राशीच्या लोकांचा काळ जरासा कठीण असेल. सूर्य नक्षत्र बदलामुळे आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी बाळगा. कठोर परिश्रम करावे लागू शकतात. चालू कामकाजात व्यत्यय येतील. तुमच्या मनात चिंता राहील. आरोग्यामध्ये दुर्बलता दिसून येते. कामे वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही जरा निराश व्हाल. वडीलधाऱ्यांच्या पाठिंब्यावर परिस्थितीवर मात कराल. सकारात्मक रहा, असा ग्रहांचा सल्ला आहे.

टीप : वरील माहिती ही ज्योतिषशास्त्र ग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment