यंदाची महाशिवरात्री आहे खूपच खास, बनतोय हा महायोग, जाणून घ्या शिवपूजन शुभ मुहूर्त, व्रतविधी, शास्त्रीय महत्व…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. यावर्षी ११ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिना वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात कृष्ण पक्षाची चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण येतो. धर्ममान्यता आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवासाठी उपवास केल्याने आणि पूजा केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

या वर्षी महाशिवरात्री ११ मार्च २०२१ ला येत आहे. हिंदू शास्त्रात महाशिवरात्रीला पूर्ण रात्रभर जागरण करत महादेवाची उपासना करण्यास सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊ महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व…

महाशिवरात्रीचं धार्मिक महत्व : महाशिवरात्रीला मोठं धार्मिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीची रात्र ही भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाची रात्र मानलं जातं. या दिवशी महादेवांनी वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनात पाऊल ठेवलं होतं. ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी अत्यंत विशेष मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जे भाविक या रात्री जागरण करुन महादेव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची उपासना आणि भजन वगैरे करतात त्या भक्तांवर शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा असते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक कष्ट दूर होतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करायला हवं.

See also  एका प्रोड्युसरने केली बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानच्या मृ'त्यू'ची धक्कादायक भविष्यवाणी, म्हणाला तू...

महाशिवरात्रीचं शास्त्रीय महत्त्व : वैज्ञानिक दृष्टीने पाहायचं झालं तर महाशिवरात्रीच्या रात्र अत्यंत विशेष असते. या रात्री ग्रहांचा उत्तरी गोलार्द्ध या अवस्थेत असतात की मनुष्याच्या आतील ऊर्जा प्राकृतिक रुपात वरच्या दिशेने जाऊ लागते. म्हणजेच प्रकृती स्वत: मनुष्याला त्याच्या अध्यात्मिक शिखरापर्यंत जाण्यास मदत करते.

दोन्ही दृष्टीने पाहायला गेलं तर प्रकृती त्या रात्री मनुष्याला परमात्माशी जोडते. याचा पूर्ण फायदा लोकांना मिळायला हवा म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करुन आणि ध्यान मुद्रामध्ये बसण्याचं सांगण्यात आलं आहे.

प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या एक दिवसाआधी म्हणजेच कृष्ण पक्ष चतुर्दशीला शिवरात्री म्हटलं जातं. पण, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. या प्रकरणी ज्योतिषांच्या मते, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे क्षीण असतो. अशा परिस्थितीत महिन्याच्या क्षय होणाऱ्या अमावस्येच्या परिणामापासून वाचवण्यासाठी अमावस्येच्या एका रात्री आधी चतुर्दशी तिथीला शिवरात्री साजरी केली जाते. यादिवशी महादेवाची आराधना केली जाते. त्याचप्रकारे हिंदू नववर्ष सुरु होण्याच्या एक महिन्यापूर्वी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्रीच्या रात्री पूजा केली जाते.

See also  'त्या' ख'त'र'ना'क नरभ'क्ष'क बिबट्याला टिपणारा शू'ट'र म्हणतो..."तर आज मी तुमच्या समोर नसतो!"

जेणेकरुन क्षय होणाऱ्या वर्षाच्या दुष्प्रभावापासून नवीन वर्षात रक्षा व्हावी. माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. तुम्हीही शिवरात्रीच्या मुहूर्ताच्या तारखेची वाट पाहत असाल. ह्या वर्षी शिवरात्री कधी आहे आणि शुभ काळ कधी आहे हे जाणून घ्या…

२०२१ महाशिवरात्री उत्सव गुरुवार ११ मार्च रोजी आहे. वास्तविक ११ मार्च रोजी चतुर्दशी तिथी मध्यरात्री निशिथ काळात आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारी तारीख बदलत आहे. म्हणूनच ११ मार्च रोजी देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाईल.

पौराणिक कथांनुसार असे सांगितले जाते की शिवरात्र हा शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा दिवस आहे. ज्या दिवशी शिव पार्वतीने विवाह केला होता. यावेळी शिवरात्री अधिक खास मानली जाते कारण या दिवशी हरिद्वार कुंभात प्रथम शाही स्नान केले जाईल.

See also  दानधर्म करताना या गोष्टी चुकूनही करू नका दान, अन्यथा तुमच्यावरच येईल दा'रिद्रय.

यंदा महाशिवरात्री अत्यंत शुभ योगात आहे : या वर्षी हा सण अगदी खास योगात साजरा केला जात आहे. या दिवशी शिव योग आहे, त्याच घनिष्ठा नक्षत्र आहे आणि चंद्र मकर राशीत असेल. म्हणून या वेळी महाशिवरात्री खूप खास मानली जाते.

महाशिवरात्री पूजेचे व्रत:

  • महाशिवरात्री व्रताची यावेळी त्रयोदशीला सुरुवात होईल. या दिवशी सकाळी उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला आणि पूजास्थळ व्यवस्थित स्वच्छ करा.
  • शिव आणि देवी पार्वती यांची मूर्ती लाकडी चौकटीवर बसवा आणि पंचामृताने अंघोळ घाला.
  • शिवलिंगला अंघोळ घालून बेलाचे पान, भांग, धतूरा, फळे आणि मिठाई देखील द्या.
  • चंदनाच्या टिळा लावून शिवाची पूजा करा आणि माता पार्वतीला कुंकू अर्पण करा.
  • महाशिवरात्री व्रत करण्याचा संकल्प करा आणि मंदिरात जाऊन शिवाला पाणी अर्पण करा.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment