जय मल्हार च्या धुमधडाक्या नंतर धडाकेबाज महेश कोठारेंची नवी कोरी मालिका येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्स ची निर्मिती असलेली एक नवी कोरी धार्मिक मालिका मराठी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत धडाकेबाज निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे.

या मालिकेचे नाव असणार आहे “दख्खनचा राजा ज्योतिबा” नुकताच या मालिकेचा भूमिपूजन सोहळा करवीर नगरी कोल्हापूरच्या चित्रनागरीत पार पडला. या नंतर लवकरच या धार्मिक मालिकेचे चित्रीकरण सुरू करणार असल्याचे श्री. महेश कोठारे यांनी सांगितले.

dakhan cha raja jotiba star pravah

“ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत “दख्खनचा राजा जोतिबा” मालिका घेऊन मराठी रसिक प्रेक्षकांच्या समोर जातांना, आमच्या संपूर्ण टीमला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. आमच्या या आधीच्या जेजुरीच्या श्री खंडेरायाच्या धार्मिक कथेवरील ” जय मल्हार ” या मालिकेला मायबाप रसिकांनी जे अमाप प्रेम आणि प्रतिसाद दिला, तसेच प्रेम आणि प्रतिसाद ” दख्खनचा राजा ज्योतिबा” ला त्यांच्यातर्फे मिळेल याची खात्री आहे” असे श्री. महेश कोठारेंनी सांगितले.

See also  8 कोटीची रोल्स रॉयस कार खरेदी करणार्‍या 'या' उद्योजकावर वीज चोरीचा आरोप

मालिकेच्या सेटचे महेश कोठारे आणि परिवाराच्या हस्ते भूमिपूजन झाल्यावर भव्य सेट उभारणीच्या कामास प्रारंभ होणार आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीत पहिल्यांदाच एवढा भव्य सेट उभारला जाणार असून साधारणपणे दोन एकर जागेत एक वस्ती, रत्नागिरी गाव, श्री ज्योतिबाचा आणि श्री अंबाबाईचा दरबार आणि एक आश्रम सुद्धा इथे साकारला जाणार आहे. श्री . महेश कोठारे म्हणाले की, ” हा सेट तयार करताना तो इतका भव्यदिव्य साकार करू की आमच्या या मालिकेचा सेट पाहण्याच्या उत्सुकतेपोटी रसिक प्रेक्षकांसोबतच कोल्हापूरला भेट देणारे पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येतील.”

jotiba

“दख्खनचा राजा ज्योतिबा” मालिकेचे चित्रीकरण कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे सुरू राहणार आहे. यासाठीच या चित्रनगरीत एवढा भव्य सेट उभारण्यात येत आहे.

या भूमिपूजन समारंभाला निर्माता महेश कोठारे, त्यांची पत्नी सौ. नीलिमा कोठारे, मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे, सून अभिनेत्री उर्मिला कोठारे, मालिकेचे कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, कोल्हापूरच्या चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

See also  बीसीसीआय विराटच्या जागी रोहित शर्माला बनवणार वनडे कर्णधार, कोहली देणार या दिवशी राजीनामा!!

कोठारे व्हिजन्स आणि कोल्हापूर हे तसं खूप जुनं व घट्ट नातं आहे. ज्योतिबाचं देवस्थान हे देखील याच पवित्र पावन करवीर कोल्हापूर नगरीत आहे. त्यामुळेच कोठारे व्हिजन्सने या मालिकेचे चित्रीकरण कोल्हापुरात करण्याचे निश्चित केले आहे.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. महेश कोठारे म्हणाले की , “कोल्हापूर या शहराला मी माझी कर्मभूमी मानतो. याच कोल्हापुरातून मी अनेक चित्रपट आणि मालिका केल्या. माझ्या आयुष्याला आणि जडणघडणीला आणि चित्रपट करियरला सुद्धा या कोल्हापुरातच कलाटणी मिळाली. आमच्या कोठारे व्हिजनच्या माध्यमातून आम्ही नेहमीच धार्मिक तसेच पौराणिक मालिकांवर भर देण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. ज्योतिबाची ही मालिका एक नवी उंची गाठून भरघोस यश मिळवेल ही आशा आहे. अत्यंत भव्य सेट सोबतच या मालिकेतुन त्या काळानुरूप वेशभूषा, विविध प्रकारचे अलंकार या अतिशय महत्वाच्या गोष्टी रसिकांना पाहायला मिळून आमची ही मालिकाही अनेक नव पायंडा नक्कीच पाडेल. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नावे आम्ही लवकरच जाहीर करू.”

See also  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ सल्लागारावर आयकर विभागाची नजर, होऊ शकते कारवाई; समोर आले धक्कादायक कारण

यापूर्वी कोल्हापुरात सलगपणे संपूर्ण मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. कोल्हापूर चित्रनगरीने आता बहुतेक अडचणी सोडविल्या आहेत. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या मालिकेचे कोल्हापुरात चित्रीकरण करणे शक्य होत आहे. चित्रीकरण पूर्ण होताच रोजचे एपीसोड चित्रनगरीतून थेट मुंबईतील स्टुडिओमध्ये अपलोड करून स्टार प्रवाह वर प्रक्षेपित करण्यात येतील.

सेट उभारणीच्या कामास लक्षात घेता अंदाजे ऑक्टोबर मध्ये मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे या मालिकेत ज्योतिबाची भूमिका कोणता कलाकार करणार? रसिकांची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचली असणार… आम्हाला कळाले की आम्ही ते कळवूच… तोवर ” ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.”

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment