महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई मांजरेकर बाबतीत केला मोठा खुलासा, म्हणाले “सलमान खान…
काही दिवसांपूर्वी सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून सलमान आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांचना प्रचंड आवडली. पण आता महेश मांजरेकरांनी एका मुलाखमतीमध्ये सईच्या भूमिकेबाबत एक खुलासा केला आहे.
महेश मांजरेकर यांनी नुकताच ‘अमर उजाला’ला मुलाखत दिली. दरम्यान त्यांना सईच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. ‘हा निर्णय माझा किंवा माझ्या मुलीचा नसून सलमानचा होता. मी त्याला कोणत्याच गोष्टीसाठी नकार देऊ शकत नाही. कारण आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो आणि तो जे काही मागेल ते मी त्याला देईन’ असे महेश मांजरेकर म्हणाले.
एक माणूस म्हणून मी सलमानला १०० पैकी १२० देईन. पण एक अभिनेता म्हणून मी त्याला १०० पैकी ७० देईन. मला त्याचा चित्रपट समजत नाही. याचा अर्थ त्याचे चित्रपट मला आवडत नाहीत असे नाही. फक्त ते मला झेपत नाहीत असे देखील महेश पुढे म्हणाले आहेत.
महेश आणि सलमान एकमेकांचे चांगले मित्र असल्याने सलमानच्या या निर्णयाला महेश यांनी नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सलमान कलाकार म्हणून चांगला आहेच. याशिवाय माणूस म्हणूनही तो उत्तम आहे. अर्थात महेश यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असता तर सईला ही भूमिका नक्कीच दिली नसती असंही त्यांनी नमूद केलं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
Murkh bavale tyane