“बिग बॉस मराठी” शो सोडण्यामागील महेश मांजरेकरांचं नेमकं कारण आले समोर, ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनवरील छोट्या पडयावरील कॉन्ट्रोवर्शियल शो तसेच संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता शो मराठी ‘बिग बॉस’ याचे चाहते बरेच आहेत. सध्या ‘बिग बॉस’ मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. या पर्वाच्या अगदी सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये सुरु असलेली भांडणे, वादविवाद अशा दररोजच्या नवनवीन ट्विस्ट मुळेच ‘बिग बॉस’ मराठीला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तर लवकरच या पर्वातील विजेता जाहीर होणार आहे. परंतु या शो चे होस्ट महेश मांजरेकर यांनी मात्र या शो मधून आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण सुद्धा नुकतेच समोर आले आहे.

हल्लीच ‘बिग बॉस’ च्या घरात एलिमिनेशन राऊंड पार पडले आहेत. यामध्ये अभिनेत्री गायत्री दातार हिने एक्झिट घेतली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या ‘बिग बॉस’ च्या चावडीत महेश मांजरेकर हे मात्र दिसले नाहीत. याच कारणामुळे त्यांनी हा शो सोडला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर ‘बिग बॉस’ या शो चे शेवटचे एपिसोड सुरु असताना ते हा शो का बरं सोडत आहेत, असा प्रश्न या शो च्या अनेक चाहत्यांना पडत आहे.

See also  'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

महेश मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी हा शो मध्येच सोडला आहे. सध्या त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी हा शो सोडला आहे. तर आता महेश मांजरेकर यांच्या जागी आपला मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सूत्रसंचालनाची भूमिका निभावताना दिसत आहे.

तर सध्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात फक्त सातच स्पर्धक असल्याने लवकरच आता ‘बिग बॉस’ च्या घरातील प्रवास संपणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ च्या तिसऱ्या पर्वातील विजेता कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता महेश मांजरेकर हे या शो चे सूत्रसंचालन करणार नाहीत, त्यामुळे सर्व चाहते नाराज असल्याचे दिसते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment