‘माझा होशील ना’ मालिकेतील सईच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं आयुष्य जाणून थक्क व्हाल!

आपल्याकडे काही गुणवत्ता कमी नाही. खूप दिगग्ज आणि ज्ञानी माणसं आपल्या कडे आहेत. अश्यात मग कलाकार ही आलेच. त्यात अभिनेते अभिनेत्री ही आल्याचं. जसं आत्ता ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याने जगात नाव कोरलेल्या शिक्षकाची आपल्याला जास्त ओळख झाली, तशी काही अभिनेत्री आहेत ज्या सध्या मालिकेत खूप उत्तम काम करत आहेत.

पण त्याचं खरं नाव आणि आयुष्य आपल्याला माहीत नसतं. जे माहीत असायला हवं. एक मालिका जी खूप लोकप्रिय आहे आणि त्यात ही लोकप्रिय पात्र ती अभिनेत्री साकारत आहे.

तिच्या यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. तिने नाटक, सिनेमा, मालिका अशा विविध माध्यमांतून विविधांगी भुमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सुलेखा तळवलकर.

सुलेखाजींना आपण अनेक दर्जेदार कलाकृतींसाठी ओळखतो. सुलेखाजींचा कलाप्रवास हा त्यांच्या लहानपणीच सुरू झाला होता. कला एकदा का अवगत झाली की ती माणसाला समृद्ध केल्याशिवाय राहत नाही.

कला ही त्यांच्या घरात रुजलेली होती. कारण तिचे आई वडिल दोघेही उत्तम चित्रकार. त्यामुळे कलेचा वारसा होताच. उत्तम चित्रकार असण्यासोबतच त्यांचा कल हा अभिनय क्षेत्राकडे होता. त्यांच्या या आवडीमुळे रुईया महाविद्यालयात असताना त्या नाट्यक्षेत्राकडे आपसूक ओढल्या गेल्या. आजकाल मुंबईत शिकून जेवढ्या अभिनेत्री झाल्या आहेत त्यातील रुईया कॉलेज मधील भरपूर आहेत. ज्यांची नावे संपता संपणार नाहीत. ऋतुजा बागवे, स्पृहा जोशी आणि इतर बरीच कलाकार मंडळी. तश्या याही तिथुनच अभिनयाचे धडे घेऊन बाहेर पडलेले आहेत.

या काळात त्यांनी एकांकिका आणि नाटके यांच्यातून सातत्याने रंगमंचावर आपला वावर कायम राहील हे पाहिलं. त्यामुळे अभिनेत्री म्हणून ही त्या सतत प्रगल्भ होत गेल्या. या काळात त्यांनी सातच्या आत घरात हे नाटक केलं होतं. तसेच रंगमंचावरील त्यांचा नैसर्गिक अभिनय आणि सहज वावर पाहून त्यांना त्यांच्या कारकीर्दीतली पहिली मालिका ऑफर करण्यात आली. त्यांनीही ती केली.

‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं या मालिकेचं नाव. पुढे नाटक आणि मालिका यांतील प्रवास चालू असताना त्यांच्या आयुष्यात काही महत्वाच्या घटनाही घडत होत्या. त्यांनी आवड म्हणून इंटिरियर डेकोरेटर म्हणून आपला अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि त्या क्षेत्रात कामही करत होत्या. पुढे अंबर तळवलकर यांच्याशी लग्न झालं.

अंबर तळवलकर हे सुप्रसिद्ध निर्मात्या, अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचे सुपुत्र. माहेरप्रमाणेच सासरीही कालाक्षेत्राचे संस्कार. त्यामुळे पुढील काही काळात त्यांनी मालिकांमधून अभिनय करणे सुरू केलं. त्यात अवंतिका, असंभव सारखे मोठे प्रोजेक्ट्स समाविष्ठ होते. या त्यांच्या वाटचालीत त्यांच्या सासूबाईंचा म्हणजे स्मिता तळवलकर यांचा खंबीर पाठिंबा होता.

तर अश्याप्रकारे अनेक अडचणींचा सामना करून. लहानमोठ्या कामातून शिकून आज त्या या प्रवासात पोहचलेल्या आहेत. माझा होशील ना या लोकप्रिय झी मराठी च्या मालिकेत त्या सध्या सई चं पात्र साकारत आहेत. जे खूप चर्चत येत आहे. त्यांना पुढील भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment