प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बीड जिल्ह्यातील एक कलाकार आज मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा एक हिरा मानला जातो. त्याचं नाव आहे मकरंद अनासपुरे. मकरंद अनासपुरे यांच्या विनोदी शैली ने आज प्रत्येकाच्या मनात घर केलेलं आहे. एवढंच नव्हे तर अनेक सामाजिक कार्यक्रम मध्येही त्यांचा सहभाग असतो. असं असताना आपल्याला त्यांच्या आयुष्यातील गोष्टी बद्दल ही माहिती असायला हवी. तर चला मग जाणून घेऊ.

Makarand Anaspure 1

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. इतकेच नाही तर त्यांनी हिंदी चित्रपटातही काम केले आहे. वास्तव, वजुद, यशवंत, प्राण जाये पर शान ना जाये, माय फ्रेंड गणेश या चित्रपटात काम केले आहे. त्यातील त्यांचा अभिनय आजही चर्चेत येतो. कारण खूप प्रामाणिक काम त्यात त्यांनी केलेलं आहे.

See also  नागराज मंजुळे यांचा हा जबरदस्त लुक तुम्ही पाहिलात का, ओळखणे देखील होऊन बसेल कठीण...

‘डॅम्बीस’ या चित्रपटाचे पटकथालेखन, दिग्दर्शन व निर्मिती देखील मकरंद यांनी केली आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, मकरंद अनासपुरे यांची पत्नी शिल्पा अनासपुरे देखील अभिनेत्री आहे.

03 548006 417908354905035 164203605 n

मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचा प्रेमविवाह आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि सिनेमांमधून कामे केली आहेत. २००० साली ‘जाऊ बाई जोरात’ या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पासोबत मकरंद यांची भेट झाली होती.

याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या. येथेच मकरंद यांनी शिल्पा यांना लग्नाची मागणी घातली. शिल्पा यांनी होकार दिल्यानंतर दोघांनी त्यांच्या घरी याविषयी सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे इंटरकास्ट मॅरेज आहे. पण दोन्ही घरुन काहीच वि’रो’ध झाला नाही. ३० नोव्हेंबर २००१ रोजी औरंगाबाद येथे दोघांचे पारंपरिक पद्धतीने विवाह झाला.

See also  "श्यामची आई" या चित्रपटातील चिमुकला श्याम सध्या काय करतो, जाणून घ्या...

Makarand Anaspure Photo Nagpur Adhiveshan Movie

लग्नानंतरही शिल्पाने काही चित्रपटात पती मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. एक दोन नव्हे तर तब्बल ५ चित्रपटांत त्यांनी मकरंद यांच्यासोबत काम केले. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या सिनेमात त्यांनी एकत्र काम केली आहेत. मकरंद आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यातदेखील शिल्पा यांचादेखील खारीचा वाटा आहे.

मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव केशव अनासपुरे असून तो नऊ वर्षाचा आहे. तर मुलगी चौदा वर्षांची आहे.

3724 makarand anaspure at amit thackerays reception

मकरंद अनासपुरे यांचा लेखन आणि दिग्दर्शन असलेला एक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. त्यासोबत त्यांनी अभिनय केलेलं ही काम लवकर येणार आहे. अश्या हरहुन्नरी म्हणून आज इंडस्ट्रीत संयम राखून वागणाऱ्या मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री म्हणून शांतपणे काम करणाऱ्या त्यांच्या पत्नीला पुढील भावी आयुष्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  'या' मराठमोळ्या अभिनेत्री स्वतःचे आडनाव मुळीच लावत नाही, कारण वाचून थक्क व्हाल!

AAUvwnhmhgs TsPe12OtzaPPWKojwEexX 149uz4RLbi9Q=s900 c k c0x00ffffff no rj

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment