केवळ लिपस्टिक लावल्यामुळे मा’र खाणारी रीमा लांबा कशी झाली बॉलीवूड से’क्स सिम्बॉल मल्लिका शेरावत…

“जर जॅकी चॅन आपले कुंग फू कौशल्य, अर्नोल्ड आपले मसल्स आणि प्रत्येकजण आपलं खास वैशिष्ट्य दाखवून सेलेब्रिटी होतो तर माझे वैशिष्ट्य असणारे से’क्स अ’पी’ल मी दाखविले तर त्यात काय चूक आहे? ” – मल्लिका शेरावत.

मित्रांनो!, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ज्या मुलीच्या घरातील वातावरण इतके क’ड’क, क’र्म’ठ होते की केवळ एकदाच लिपस्टिक लावून स्वतःला आरशात न्याहाळत असणाऱ्या त्या मुलीला तिच्या आईने झो’ड’पू’न काढले होते, त्याच मुलीने मोठी झाल्यावर एकाच फिल्म मध्ये ऑन स्क्रीन १७ कि’सिं’ग सीन्स (ऑफ स्क्रीन रिटेक्सची तर गणतीच नाही) देऊन समस्त बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये ख’ळ’ब’ळ मा’ज’व’ली होती.

परंतु हे सर्व काही एका रात्रीत घ’ड’ले नाही. अनेक भावनिक, शारीरिक, आर्थिक व सामाजिक अ’ड’थ’ळे पार करत रीमा लांबा नावाची सर्वसाधारण मुलगी बॉलीवूड से’क्स सिम्बॉल मल्लिका शेरावत झाली.

रीमा लांबा उर्फ मल्लिका शेरावतचा जन्म २४ ऑक्टोबर १९७६ रोजी हरियाणाच्या रोहतक येथे झाला. वडील मुकेश कुमार लांबा अभियंता आणि आई संतोषदेवी या सुखवस्तू गृहिणी. एका मुलाखतीत मल्लिका म्हणाली होती की, तिचे कुटुंब बऱ्यापैकी पुराणमतवादी होते. तिच्या कुटुंबातील अक्षरशः महिलांना गोठ्यातील जनावरांप्रमाणे बंदिस्त आणि सन्मानहीन वागणूक मिळत असे. ते सधन कुटुंब होते, त्यांच्याकडे पैसे होते पण स्वातंत्र्य नव्हते.

महिलांना घुं’घ’ट ओढुनच राहावे लागे. त्यांना घराबाहेर पडायला परवानगी नव्हती. मल्लिकाने आरंभिक शिक्षण रोहतकच्या एका शाळेत केलं. जेव्हा ती आठवीत गेली, तेव्हा तिचे वडील दिल्लीत शिफ्ट झाले. मल्लिकाचे उर्वरित शालेय शिक्षण डीपीएस मथुरा रोड येथून पूर्ण झाले. जेव्हा ती दहावीत शिकत होती, तेव्हा तिला टी व्ही पाहून हिरोईन सारखे सजावे, नटावे असे वाटे.

कुणाच्याही नकळत एक दिवस मल्लिका लिपस्टिक लावून आरशात स्वतःला न्याहाळत, स्वत:ची प्रशंसा करीत होती. तेंव्हा अचानक तिथे आलेल्या तिच्या आईने हे पाहिले. ती प्रचंड सं’ता’प’ली. हे काय थेरं लावले आहेत? वैगेरे बडबड करून तिने मल्लिकाला खूप मा’र’हा’ण केली. आजून मोठा तमाशा नको म्हणून तिने ही बाब मल्लिकाच्या वडिलांना कळू दिली नाही. अन्यथा तिचे काही खरे नव्हते. मल्लिका मुलांच्यापासून दूर राहावी म्हणून वडिलांनी तीला मिरांडा हाऊस, गर्ल्स कॉलेज, दिल्ली विद्यापीठात दाखल केले जिथे ती फिलॉसॉफीचे शिक्षण घेत होती.

गर्ल्स कॉलेजच्या या काळात मल्लिकाने कुटुंबापासून छुप्या पद्धतीने मॉ’डे’लिं’ग सुरू केली. पण तिचे लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये जाण्याचे स्वप्न होते. तिने हे घरच्यांना सांगितल्यावर प्रचंड गों’ध’ळ उ’डा’ला. प्रथम वडिलांना वाटले की मल्लिका थट्टा करीत आहे. परंतु जेव्हा तिने सि’रि’य’स’ली सांगितले तेव्हा वडील खूप गं’भी’र झाले. तिच्या वडिलांनी सर्व संबंध तो’ड’ले.

वारस म्हणून नाव र’द्द केले (म्हणून ती वडिलांचे लांबा हे आडनाव न लावता शेरावत हे आईचे माहेरचे आडनाव लावते.) घरातूनही हाकलून दिले पण मल्लिकाचा निश्चय अ’ट’ळ व अंतिम होता. ती मुंबईला आली तेंव्हा ती १८ वर्षांची होती. तिच्या आजीने तिला काही सोन्याचे दागिने दिलेले होते. मल्लिकाने तेच दागिने विकून मुंबईत जगण्याचा व ब’स्ता’न बसवण्याचा संघर्ष सुरू केला.

मल्लिका दिल्लीहून मुंबई आली. पण कोणतेही नियोजन नाही, ओळख नाही . काही दिवस आजीने दिलेले दागिने विकून खर्च भागवला. कोणत्याही कौटुंबिक पाठिंब्याशिवाय मल्लिका मुंबईसारख्या क्रू’र शहरात राहत होती आणि काम शोधत होती. ती दररोज ऑडिशनला जायची, नाकारल्यानंतर घरी यायची आणि खूप र’डा’य’ची. पण तिने जिद्द सोडली नाही. अखेर हळू हळू तिला कामे मिळायला सुरुवात झाली.

जेव्हा मल्लिकाला पहिला चित्रपट मिळाला तेव्हा त्यासाठी स्वतःचे नाव बदलण्याचा तिचा अजिबात हेतू नव्हता. पण त्या काळात रीमा, रायमा नावाच्या काही नायिका आधीच बॉलिवूडमध्ये काम करत होत्या. अशा परिस्थितीत, मल्लिका आणि तिच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद मेनन यांना वाटले की रीमा हे कॉमन नाव ऐकल्यानंतर प्रेक्षकांचा इतर नायिकांच्या व तिच्या नावात सारखेपणा व गों’ध’ळ उडू शकतो. म्हणूनच रीमाचे नाव बदलून मल्लिका करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आणि तिला वडिलांचे आडनाव वापरणे शक्य नव्हते म्हणून रीमाने तिच्या आईचे आडनाव आपल्या नावाशी जोडले आणि… आज ती मल्लिका शेरावत आहे…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment