“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेतील ममता काकुंच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या मराठी मालिका या खुप लोकप्रिय होत आहेत. त्या बघण्याचा प्रेक्षकांचा कल ही चांगलाच वाढलेला आहे. त्यात भूमिका करणारे कलाकार ही खुपच लोकप्रिय झालेले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर प्रमुख भूमिका करणारे च आपण जास्त लक्ष्यात ठेवतो. पण ज्यांनी छोटीशी भूमिका जरी केली तरी किती लक्षात आहे अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तर येऊ कशी तशी ही मालिका खूप लोकप्रिय आहे. टीआरपी बाबत ही आघाडी घेत आहे. त्यात प्रमुख भूमिका केलेल्या सगळ्याच चाहत्यांना परिचित आहेत; फक्त त्यातली ममता कुणालाच नाही माहिती. चला सविस्तर जाणून घेऊ.

झी मराठीवरील ( zee marathi ) ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ( yeu kashi tashi nandayla ) या मालिकेची सध्या चर्चा जोरात सुरूय. ही मालिका आता एक रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. ओम आणि स्विटूने आपल्या प्रेमाची कबुली नलू समोर दिलीय. त्यानंतर ओमच्या हट्टापुढे माघार घेत नलूने त्यांच्या लग्नासाठी ओमकडे एक अट घातली आहे. १५ दिवसांसाठी स्वतः कष्ट करून गरिबीत जगून २५ हजार रूपये कमवून दाखवलं तर ती दोघांच्या लग्नाला तयार होईल, अशी अट घातली आहे.

See also  अभिनेत्री श्रुती मराठेचे पावसातील फोटो सोशल मीडियावर होत आहे खूपच व्हायरल...

200212811 643400883724631 3474799275416550694 n

या अटीनुसार आता तीन दिवस संपलेले असतात, तरीही ओमला कुठेच नोकरी मिळत नाही. अखेर पैसे कमवण्यासाठी ओम भाजीवाला बनून भाजी विकताना दिसणार आहे. तर ओमच्या या परिस्थितीत त्याला साथ देण्यासाठी स्विटू सध्या एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. मात्र या मालिकेत जी ब्यूटी पार्लरची मालकीण ममता काकी मुळे वेगळं चित्र दिसून येतंय. ममता काकीमुळे ज्या पद्धतीने मालिकेत ट्विस्ट आलाय तशाच तिच्या अभिनयाचाही एक ट्विस्ट आहे.

झी मराठीवरील घरघरात पाहिली जात असलेल्या ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत आतापर्यंत स्विटू, ओमकार, नलू, शकू, रॉकी ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. तसंच आणखी एक पात्र सध्या या मालिकेत स्कोप घेतंय ते म्हणजे स्विटू काम करत असलेल्या ब्यूटी पार्लरची मालकीण ममता काकी होय.

See also  "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेतील जयदिपच्या खऱ्या आयुष्यातील सख्खा भाऊ आहे हिंदीतला लोकप्रिय अभिनेता...

209049679 2107259056081286 7271401498321479536 n

नलूने दिलेली अट पूर्ण करण्यासाठी स्विटू सुद्धा ब्यूटी पार्लरमध्ये काम करून पैशांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करते. पण या ब्यूटी पार्लची मालकीण ममता काकी स्विटूला घालून पाडून बोलते. शिवाय मालविकाच्या सांगण्यावरून तिने नलू मावशीला स्विटूच्या लग्नासाठी मुद्दाम जाड मुलाचं स्थळ देखील सुचवलं होत. पण तुम्हाला माहितेय का, या सीनमधील ममता काकी यापूर्वी आणखी बऱ्याच मालिकेत झळकली आहे. त्यामूळे ही ममता काकी प्रेक्षकांनी ओळखीची झाली आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ममता काकीची भूमिका अभिनेत्री वर्षा पडवळ हिने साकारलीय. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘श्रीमंत घरची सून’, ‘डॉक्टर डॉन’ , ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘देव पावला’, ‘मोलकरीणबाई’ , ‘जिजामाता’ अशा अनेक मालिकांमध्ये ती छोट्या-मोठ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे.

तिच्या भूमिका छोट्या असल्या तरी मालिकेत ट्विस्ट आणणाऱ्या आहेत. यापूर्वी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेमध्ये त्यांनी लेडीज सिक्यूरिटी गार्ड बनून प्रेक्षकांसमोर आली होती. यात तिने गुरुनाथला दिलेला चोप हा प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला होता.

अभिनेत्री वर्षा पडवळ ( varsha padval ) हिने मालिका व्यतिरिक्त काही शॉर्ट फिल्म्समध्ये देखील काम केलंय. अभिनया सोबत त्यांना डान्सची देखील खूप आवड आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत ममता काकी बनून त्या खडूस, स्वार्थी आणि घालून पडून बोलणाऱ्या महिलेच्या स्वभावाच्या दाखवल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्या खूप मनमिळावू स्वभावाच्या आहेत. मात्र, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ( yeu kshi tashi mi nandayala ) मालिकेमुळे अभिनेत्री वर्षा पडवळ चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तिला मात्र प्रसिद्धी आवडत नाही. पण मी तिच्याशी बोललं नाही कसं वाटेल तिला.

See also  "बाई, बुब्स आणि ब्रा" हेमांगी कवीच्या या पोस्टवर तृप्ती देसाई यांनी विचारला रोखठोक प्रश्न...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment