या मेकॅनिकने लढवली अशी शक्कल कि फक्त एक लिटरमध्ये गाडी देते तब्बल 150 किलोमीटरचे एवरेज…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो हे तर आपल्याला माहीतच आहे की, स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अपार मेहनतीची, जिद्दीची गरज असते. त्याआधी आपल्या स्वप्नांवर स्वतःचा ठाम विश्वास असायला हवा. प्रत्येक हलाखीच्या परिस्थितीत स्वप्न साकार करण्याची जिद्द असावी.

तेव्हा सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक कठीण गोष्ट साध्य करता येते. आपल्या भारतात तर कित्येक लोक स्वतःच्या हिंमतीवर आयुष्यात मोठे झालेले आपण ऐकले आहे. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

navbharat times

युपीतील कौशांबी या जिल्ह्यात विवेक नावाच्या एका युवकाने एक असा पराक्रम केला आहे, जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. विवेक हा गुदङी या गावातील राहणारा मुलगा आहे. अहो, पण जर त्याचा हा कारनामा यशस्वी झाला तर ऑटोमोबाईल्स क्षेत्रासाठी चमत्कार ठरेल. तसे ही, आपल्या भारतातील लोकांना हे टेक्नॉलॉजीचे कारनामे करणे, काही अवघड नाही. कारण असे कारनामे तर आपल्याकडे लहानपणापासून करायला सुरुवात केली जाते. मग योग्य संधी मिळाली की आपल्या बुद्धीच्या जोरावर ते यशस्वी सुद्धा करतात.

See also  जेव्हा अभिनेत्री रवीना टंडनचे नाव तिच्याच भावासोबत जोडले गेले होते, रडून रडून झाली अशी अवस्था...

कौशांबी येथील गुदङी गावातील या विवेक कुमार पटेल याला 2001 मध्ये 12 वीत असताना फिजिक्स मध्ये एक फॉर्म्युला मिळाला होता. विवेकने सांगितले की, या फॉर्म्युल्याचा मी बाईक, जनरेटर आणि इतर वाहनांचा एवरेज वाढवण्यासाठी प्रयोग करून पाहिला. शेवटी तो यशस्वी ठरला.

increase bike average 01.03.18 1

यासाठी विवेकने पिपरी, पहाङपुर या गावातील एका मिस्त्रीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथे त्याने जवळजवळ दोन वर्षे या फॉर्म्युल्यावर काम केले. या प्रयत्नांचे फळ त्याला तेव्हा मिळाले, जेव्हा उत्तर प्रदेश काऊंसिलिंग फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी आणि मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद ने प्रमाणित केले.

विवेक कुमार च्या मते, त्याच्या या टेक्निकमुळे बाइकचा एवरेज 150 किलोमीटर प्रतिलीटर होईल, जो साधारणपणे फक्त 50-60 चा एवरेज देते. विवेकने सांगितले की, बाईक रिपेअरिंग शिकण्याच्या दरम्यान त्याने इंजिनातील बदलांमध्ये टेस्ट करायला सुरुवात केली. मग 2012 मध्ये बजाजची ङिस्कवर बाईक खरेदी केली.

See also  हनीमूनच्या रात्री नवरीने केले असे काही, ज्यामुळे तिच्या पतीच्या आयुष्यात आला भूकंप...

increase bike average 01.03.18 3

त्यानंतर त्याच्या इंजिनात बदल केले. या बदलामुळे त्याचा एवरेज ङबल झाला. अखेरीस विवेकच्या 17 वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याने सांगितले की, एवरेज वाढवण्यासाठी बाईक मध्ये असलेला कार्बोरेटर बदलून तो स्वतःचा कार्बोरेटर लावायचा. यासाठी त्याला 500 रु. खर्च यायचा.

विवेक ला या कामासाठी काही जवळच्या लोकांनी मदत केली आहे. त्याने सांगितले की, कार्बोरेटर बनवण्यासाठी कंपनीला 75 लाख रुपयांची गरज आहे. तर त्याच्या या नवीन स्टार्टअपसाठी जम्मू काश्मीर मधील श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी च्या टेक्नॉलॉजी बिजनेस इंक्युबेशन सेंटरने त्याला या रकमेची मदत केली आहे.

increase bike average 01.03.18 2

विवेक च्या कारनाम्याला इनोवेशनची मान्यता मिळाली आहे. युपीसीएसटीचे ङायरेक्टर राधेलाल यांच्या मते विवेकने पेट्रोल सप्लाय कमी करून एवरेज वाढवण्याची शक्कल लढवली आहे. या दरम्यान बाईकच्या मायलेज मध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे.

See also  या देशातील महिला करतात मृ'त मु'ड'द्यासोबत लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

तसेच पेट्रोलच्या कमी वापराने इंजिन सुद्धा गरम होत नाही. त्यामुळे पेट्रोल जास्त लागत नाही. त्यामुळे स्पीड आणि पिकअप मध्ये देखील काही परिणाम झाला नाही. या टेक्निक चे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद च्या मेकॅनिकल इंजिनियर ङिपार्टमेंट मध्ये टेस्टिंग करण्यात आले आहे.

vivek kumar patel

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment