मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लग्नानंतर नऊ महिन्यांत दिली ‘गुड न्यूज’…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो!, वाट बघतोय रिक्षावाला फेम मराठमोळी डान्स क्वीन सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने (Manasi Naik) लग्नानंतर नऊ महिन्यांत ‘गुड न्यूज’ दिली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची गोड बातमी तिने चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये मानसीचा बेबी बंप पहायला मिळतोय. ‘कमिंग सून’ (coming soon) असा हॅशटॅग तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे.

मातृत्वाचा लाभ होणे हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. असे म्हणतात की, आई होताना स्त्रीचा दुसऱ्यांदा जन्म होतो. यंदाच्या वर्षी मराठी , हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींना मातृत्व लाभलं आहे. ज्याच्या बातम्या आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिल्या आहेत. पण आता या अभिनेत्रींच्या यादीत मराठमोळी मानसी नाईकही सामील होणार आहे का ? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय…

See also  "मन झालं बाजिंद" मधील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे अशी, पहा तिचे सुंदर फोटो...

आत्ताच्या घडीला समोर आलेल्या मानसी नाईकच्या सोशल मीडियावरील एका फोटोवरून, ती आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरं तर मानसीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे . या फोटोमध्ये ती फेक बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने साडी परिधान केली आहे. सोबतच तिने एका हातात कॅडबरी पकडली आहे, तर दुसरा आहे बेबी बम्पला लावला आहे.

download 3

या फोटोमध्ये मानसीच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी पाहण्यासारखे आहे. विशेष म्हणजे, हा फोटो शेअर करत मानसीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “कमिंग सून.” मानसीचा हा फोटो पाहून तिच्या सर्व चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडून ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला जात आहे . इतकेच नव्हे, तर नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून तिला शुभेच्छा द्यायलाही सुरुवात केली आहे. मात्र हा एखाद्या आगामी प्रोजेक्टचा संकेत आहे का? की मानसी नाईक खरंच आई बनणार आहे? हे येत्या काळातच समजेलच.

See also  "माहेरची साडी" फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव...

मानसीच्या फिल्मी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले , तर तिने २००७ साली ‘ जबरदस्त ‘ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. ईटीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘ बाई वाड्यावर या ‘ या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली . मानसी अभिनयापेक्षा तिच्या नृत्य कौशल्यामुळे ओळखली जाते. मानसीने जानेवारी महिन्यात प्रदीप खरेरा याच्याशी लग्नगाठ बांधली होती.

प्रदीप हा बॉक्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये मानसी आणि प्रदीपने साखरपुडा केल्याचं जाहीर केलं होतं. साखरपुड्याच्या आधी काही महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. मानसी महाराष्ट्रीयन आहे तर प्रदीप हा हरियाणाचा आहे. हे दोघं त्यांच्या युट्यूब चॅनलद्वारेही चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. मानसी नाईक तिच्या उत्तम नृत्यामुळे ओळखली जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही तिची गाणी तुफान गाजली होती. मानसी सोशल मिडियावरही तितकीच सक्रिय असते. टिकटॉकवर देखील वेगवेगळे व्हिडिओ करत तिने लाखो चाहत्यांना प्रेमात पाडलं होतं.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment