लग्नानंतर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केलेला हा व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल…
“लग्न हे सतजन्मांचे पवित्र बंधन” यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकले आहेत. लावणीच्या ठुमक्यांवर रसिकांना मं’त्र’मु’ग्ध करणारी अभिनेत्री मानसी नाईक हिने देखील काही महिन्यांपूर्वीच इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत विवाह केला आहे.
मानसीने आपल्या लग्नाचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर केले होते. परंतु तुम्ही कदाचित तिचा हा व्हिडीओ पाहिला नसेल. कारण हा व्हिडीओ मानसीच्या लग्नानंतरचा आहे.
तर नुकताच तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडीओ माझ्यासाठी खूपच खास आहे, त्यामुळे तुम्हीपण हा व्हिडीओ नक्की पाहा, असे देखील तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे.
लग्नानंतर नववधू पहिल्यांदाच सासरचे माप ओलांडते. तेव्हा रितीरिवाजानुसार अनेक विधी केल्या जातात. याची एक भन्नाट झलक मानसीने आपल्या या शेयर केलेल्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळते.
या व्हिडिओ मध्ये नववधूच्या पोषाखात असलेली मानसी आणि तिचा पती प्रदीप रंगपाणी खेळताना दिसत आहे. त्यामध्ये अंगठी शोधताना प्रत्येक वेळी प्रदीप बाजी मारताना दिसत आहे.
अभिनेत्री मानसी व प्रदीप हे खूप कालावधीपासून एकमेकांना ङेट करत होते. शेवटी यावर्षी 19 जानेवारीला मानसी व प्रदीप हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. मानसीचा नवरा हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्याचसोबत तो एक अभिनेता आणि मॉडेल पण आहे.
प्रदीप खरेरा हा सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटोज् शेयर करत असतो. त्यामुळे तो सोशल मीडियावर सदैव एक्टिव असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे पाच लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. प्रदीपच्या लुकवर फिदा होणारे अनेकजण आहेत.
तर मानसी नाईक ही एक उत्तम नृत्यांगना असून तिने ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल आणि मराठी तारका ह्यांसारख्या अनेक मराठी रियालिटी ङान्सिंग शो मधून तिने स्वतःच्या ङान्सची झलक दाखवली आहे. त्याचप्रमाणे आपल्या अप्रतिम अभिनयाने मानसी नाईकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.