फायनली मी नाॅटी गर्ल मला लगीन करायचं असं म्हणतं, या अभिनेत्रीचा पार पडला लग्नसोहळा!
“आय एम अ नाॅटी गर्ल आय एम अ शोना शोना”, “मला लगीन करायचं”, “बाई वाड्यावर या”, “मस्त चाललयं आमचं”, “आख्खा सिनेमा पाहून घे”, “इश्काची बेबी डाॅल”, अशा गाण्यांची नाव घेतल्यावर साहजिकच तुमच्या नजरेसमोर त्या मनमोहक अभिनेत्रीचा चेहरा आलाच असेल.
नेहमी गाण्यात डान्समधून आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी एकमेव दर्जेदार मराठी अभिनेत्री म्हणजे “मानसी नाईक”. मानसी नाईक हिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटने गेल्या वर्षभरापासून चाहत्यांच अधिकच लक्ष वेधून घेतलं होतं; त्याच कारण होतं तिचा झालेला साखरपुडा. आणि आता उत्सुकता होती ती तिच्या लग्नाची. काही अगदी ह्रदयापासून मानसीचे फॅन असलेल्या चाहत्यांना कदाचित तिचं लग्न झाल हे ऐकून थोडसं वाईट निश्चित वाटू शकतं.
परंतु महत्त्वाची बाब म्हणजे मानसीने आपला जोडीदार अगदी सुझबुझ पद्धतीने निवडलेला दिसतो. लग्नाच्या काही दिवसांआधीच आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत मानसीने फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शन लिहिला होता ज्यातून त्या दोघांच नात आता किती घट्ट निर्माण झाल आहे याची प्रचिती येऊ शकते. लगा दुंगी तुझपे ऐसी “प्रायव्हसी”, अगर कोई तेरा नाम भी लेना चाहे, तो “ओटीपी” मेरे फोन में आये. असा हा कॅप्शन होता. आणि तिचा जोडीदार आंतरराष्ट्रीय बाॅक्सर प्रदीप खरेरा हा आहे. प्रदीप खरेरासोबत मानसी नुकतीच विवाहबंधनात अडकली आणि सोशल मीडियावर तिच्या लग्नसोहळ्याच्या फोटोजचा शेअररींगचा वर्षाव सुरू झाला.
सध्या कोरोनामधून विस्कळीत झालेल जनजीवन अजूनही पूर्णत: योग्य पदावर आलेल नसल्याने खबरदारी बाळगत मानसी व प्रदीप यांनी काही मोजक्या मित्र मैत्रिणी व कुटुंबयासीयांच्या उपस्थितीत लग्न केले. मानसीची अगदी जिवाची मैत्रीण अभिनेत्री दिपाली सय्यद सोबतच रेशम टिपनीस यांनीही विवाहास हजेरी लावली. मानसी आणि प्रदीप यांच प्रेम जाहीर झालचं होतं, लग्नाची औपचारिकता मात्र बाकी होती असं म्हणायला हरकत नाही आणि तीदेखील आता पूर्ण झाली.
मानसीचा पती प्रदीप खरेरा हा प्रसिद्ध अंतरराष्ट्रीय बाॅक्सरपटू आहे. प्रदीपची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोविंगदेखील आहे, तो नेहमी प्रकाशझोतात राहिला आहे. बाॅक्सरपटू व्यतिरिक्त तो एक माॅडेलदेखील आहे. त्याने डब्ल्यूबीसी एसियन चॅम्पियन हे शिर्षकही पटकावल आहे. यासोबत मिस्टर इंडिया युनायटेड कॅन्टोनेंट्स 2018 चा विजेताही आहे. रूबरू मिस्टर इंडिया 2018 देखील त्याच्याच नावावर आहे.
प्रदीप अनेकदा सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत माॅडेलिंगचे फोटो व इतर व्हिडिओज् शेअर करत असतो. मानसी च्या कारकिर्दीबद्दल तर सर्वांना ठाऊकच आहे. मानसी नाईकने जबरदस्त, टार्गेट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका यांसारख्या चित्रपटांमधून आपला अभिनय प्रेक्षकांसमोर मांडला आहे.
मानसी नाईक उत्तम अभियानासोबतच उत्कृष्ट नर्तिकादेखील आहे, ज्या कारणास्तव तिने मराठी गाण्यांमधे अनेकवेळा भन्नाट परफाॅर्मंसेस दिले आहेत. मानसी आणि प्रदीप यांच्या विवाहाची गोष्ट नक्कीच शुभाशुभरित्या मार्गी लागावी हीच गोड सदिच्छा!
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!