प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईकने लग्नाच्या महिनाभरातचं दिली गुड न्यूज, पहा काय आहे खुशखबर?
काही दिवसांपूर्वीच मराठी सिनेसृष्टीतल्या सर्वात लाडक्या आणि चहित्या असणाऱ्या अभिनेत्रीचा अर्थात मानसी नाईक हिचा विवाहसोहळा प्रदिप खरेरा याच्यासोबत पार पडला. मुळात त्यांच्या लग्नाला नुकताच पहिला महिना पूर्ण होत आहे. आणि थेट महिनाभरातच मानसीने सर्वांना आश्चर्याची गुड न्यूज देत थेट एक सुखद ध’क्का दिला आहे.
लग्नाच्या अवघ्या एक दोन दिवसातच आपल्याला मानसी तिच्या सासरी गेलेली पहायला मिळाली होती. तिने सासरचे अनेक फोटो आणि त्यासोबत कॅप्शन लिहीत तिथल्या गोष्टींबाबत माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. प्रदिप खरेरा याचं गाव फरिदाबाद येथे काही दिवस मानसी आणि प्रदीप यांचा मुक्काम झाला होता.
आणि आता येथून ते पुन्हा मुंबईत परतले आहेत. मुळात लग्नाच्या महिनाभरातील खुप साऱ्या गोष्टींचा मानसीने आनंदही घेतला आहे. आणि ती तिच्या लग्नानंतरच्या जीवणाचा खऱ्या अर्थानं पाऊलोपावली आनंद घेत असल्याचं पहायला मिळतं आहे. मानसी तिचे आणि तिचा नवरा प्रदीप दोघांचे अनेक फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असताना आता नुकतीच तिने एक गोड आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.
ती बातमी म्हणजे, लवकरचं तिचा आणि प्रदिप या दोघांच्या लग्नाचा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची खबर एका व्हिडिओच्या माध्यामातून दिली आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या माध्यामातून तिने एकप्रकारे त्याच म्युझिक अल्बमचा टिझर शेअर केला आहे.
“लग्न होऊनी महिना झाला, ऋतू बहरला, वाटेवर मोगरा उमलला अन दरवळला, मनी मानसी डोळ्यांमधे भाव उतरले, प्रदिप झाले अवघे जगणे आणि उजाळले”, अशा जबरदस्त ओळींमधून व्हिडिओवर कॅप्शन देत मानसीने जेव्हा हा टिझर अपलोड केला त्याचक्षणी रसिकप्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर खुप साऱ्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
मानसी आणि प्रदीप यांची प्रेमकहाणी खुलली आणि ती लग्नात रूपांतरित झाली यापेक्षा मोठी गोष्ट चाहत्यांसाठी नक्कीच कोणती नाही. आणि त्यातही आता त्या दोघांच्या जोडीचा एक म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार त्यामुळे रसिकप्रेक्षकांच्या मनात साहजिकचं अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालेल आहे.
मानसीचा पती प्रदीप खरेरा हा प्रसिद्ध अंतरराष्ट्रीय बाॅ’क्स’र’प’टू आहे. त्याचसोबत तो माॅ’डे’लिं’ग’देखील करतो. तो नव्याने अभिनय देखील शिकला असल्याची खबर मिळाली आहे. कदाचित भविष्यात तो आपल्याला एखाद्या चांगल्या भुमिकेत पडद्यावर पहायला मिळेल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच राहिलं.
त्याची वैयक्तिकरित्या इन्स्टाग्रामवर फॅन फाॅलोविंग चांगलीच आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. मानसी नाईक हिच्या मराठी सिनेसृष्टीतल्या कामाबद्दल आपण आजवर सर्व जाणतो आहोतच. तरी बऱ्याच काळापासून तिचा एखादा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस आला नसल्याने प्रेक्षकांना तिच्या भविष्यातील नव्या प्रोजेक्टची आतुरता लागली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!