प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मनवा नाईकचा नवरा आहे हा प्रसिद्ध व्यक्ती, नाव ऐकून विश्वास बसणार नाही…
आजच्या घडीला मराठी मालिका क्षेत्रात आपले पाय यशस्वी पणे रोवून एका पेक्षा एक बेहत्तर निर्मिती देत असलेली एक अभिनेत्री आहे. जिचे अनेक चाहते आहेत. तिला ते सोशल मीडियावर फोल्लो करत असतात. जिचं अभिनेत्री म्हणून ही काम खूपच लोकप्रिय असं आहे. तिचं नाव आहे मनवा नाईक.
होय जी आता अनेक मालिकांचे निर्मिती करते. पण आपल्याला माहीत आहे का लग्ना आधी ती फक्त अभिनय करायची आता तिचा नवरा प्रसिद्ध निर्माता होता म्हणून तीही आता एकजुटीने जोमाने हे सांभाळत आहे. तर चला जाणून घेऊ अभिनेत्री मनवा नाईक च्या नवऱ्या विषयी ..
मनवा नाईकने आजवर अनेक मराठी चित्रपटात, नाटकात, मालिकांमध्ये काम केले आहे. मनवाने केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीमध्ये देखील तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बा बहू और बेबी, तीन बहुराणीयाँ यांसारख्या मालिकांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने जोधा अकबर या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. नो एंट्री पुढे धो’का आहे, जाऊ द्या ना बाळासाहेब, फक्त लढ म्हणा यांसारख्या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे.
अभिनयात यश मिळाल्यानंतर मनवा दिग्दर्शनाकडे वळली. तिने पोर बाजार या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे तिने केलेले दिग्दर्शन प्रेक्षक आणि समीक्षक दोघांना देखील आवडले होते. दिग्दर्शनासोबत तिने निर्मितीक्षेत्रात देखील पाऊल ठेवले आहे. चूक भूल द्यावी घ्यावी या तिच्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. सरस्वती या मालिकेची देखील निर्माती तीच आहे.
मनवान 2017मध्ये निर्माता सुशांत तुंगारेसह लग्नाच्या बेडीत अडकली. सुशांत हाही एक प्रसिद्ध निर्मात असून त्याने मालिकांची निर्मिती केली आहे. दोघांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकरांनी उपस्थिती लावली होती. मनवाने सोशल मीडियावर अकाऊंटवर सुशांतसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मनवा ही प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक यांची कन्या आहे.
तर मनवा नाईक सध्या तू सौभाग्यवती भव आणि अजून एक मालिका निर्मिती करत आहे. तिचं काम असेच वाढत जावो आणि तिला आभाळभर यश मिळो यासाठी तिला व साऱ्या कुटुंबातील व्यक्तीला पुढील भावी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.