केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू

Advertisement

नवी दिल्ली: आज संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल आणि विस्तार होणार आहे. यात अनेक नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक, कामगार व रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार, महिला व बालविकास राज्यमंत्री देबाश्री चौधरी यांचा समावेश आहेत.

तसेच सदानंद गौडा यांनीही राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारच्या 10 मंत्र्यांनी राजीनामा दिला असून त्यात संजय धोत्रे, थावरचंद गहलोत, रतनलाल कटारिया आणि रावसाहेब पाटील यांचाही समावेश आहे.

Advertisement

खात्रीलायक सूत्रांनुसार, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर इतर अनेक मंत्र्यांची बढती होऊ शकते. किरण रिजिजू, मनसुख मंडाविया, हरदीप पुरी, कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची बढती होऊ शकते.

See also  सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या मांडीवर बसलेल्या मुलाचे कार्य वाचून तुम्हाला अभिमान वाटेल !

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश निशंक यांनी राजीनाम्याचे कारण समोर येत आहे. रमेश पोखरीयल निशंक यांनी प्रकृतीविषयी कारणे सांगून राजीनामा दिला आहे. काही काळापूर्वी त्यांना कोविड -19 चा संसर्ग झाला होता. प्रकृती सुधारल्यानंतरही आरोग्याच्या समस्या लक्षात घेता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तसेच थावरचंद गहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचाही राजीनामा घेण्यात आला असून. तसेच रावसाहेब दानवे यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संध्याकाळ पर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Advertisement

Leave a Comment

close