मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांची पत्नी सुद्धा आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या हिरो हिरोईन यांच्या चाहत्यांना नेहमी त्यांच्या पडद्यावरच्या गोष्टी पेक्षा पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. तर सध्या आपण अश्या मराठी लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नी बद्दल जाणून घेणार आहोत की आरा रा रा खतरनाक. आलं ना लक्षात.

होय नावाजलेले लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अश्या तीनही गोष्टीचा एकत्र संगम असलेले प्रवीण तरडे यांच्या बद्दल. तर काय झालं प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पत्नी ची एक पोस्ट भारावून टाकणारी पोस्ट टाकली. जी खूप व्हायरल झाली. मग चाहत्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली ते म्हणजे की त्यांची पत्नी नेमकं कोण आहे?

एखादा व्यक्ती जर गाजला ना तर मग सगळी कडे फक्त त्यांचीच चर्चा होत असते. प्रवीण तरडे हे आज दिगग्ज होऊन बसले आहेत आज इंडस्ट्रीत. कारण काय तर मुळशी पॅटर्न चित्रपटातून दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. हा सिनेमा त्यांना प्रचंड यश देऊन गेला.

प्रसिद्धी तर लाख मोलाची दिली. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट महाराष्ट्र मध्ये चांगलाच गाजला. सत्याची जाणीव करून देणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट होता.

See also  पुष्पा सिनेमातील स्त्रीवल्ली या गाण्याचा मराठी वर्जन तुम्ही ऐकलात का हो, अमरावतीच्या पोरांची ही कमाल एकदा नक्कीच पाहा.

75223673 2685125091508749 4183665731080028160 n

या चित्रपटात प्रवीण तरडे यांची भूमिका छोटी असली तरी खूप महत्त्वाची होती म्हणून या चित्रपटातील त्याचे अभिनयाचे विशेष कौतुक झाले. आणि या सर्व गोष्टी मुळे खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेता घेता गोष्ट पत्नी पर्यंत येऊन पोहचली. कारण अनेकांना माहिती नाही आहे. त्यांची पत्नी सुद्धा एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. तर चला मग जाणून घेऊया सविस्तर.

त्यांच्या पत्नीने त्यांना आत्तापर्यंत सावली सारखी साथ दिली म्हणून तर एवढ यश मिळू शकले. स्वतः अभिनेते सुद्धा हे कबूल करतात. लोकप्रिय लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते असलेले प्रविण तरडे ( pravin tarde ) यांच्या पत्नीचे नाव स्नेहल ( snehal tarde ) आहे. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील ते मुलगा.

58441886 2339581509396444 447470918625656832 n

अजूनही ग्लॅमरस काहीच त्यांनी आयुष्यात लागू केलं नाही. साधं राहतात तुमच्या आमच्या सारखं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आजही त्यांचे वडील शेतकरी आणि शेती करतात . स्वतः तरडे सुद्धा म्हणतात मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा मला अभिमान असल्याचे ते नेहमी आवर्जून सांगतात.

See also  अभिनयासाठी सोडले पुणे आणि गाठली मुंबई... आज आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..

बघा यश मिळवून सुद्धा जो जमिनीवर राहतो तो खरा. प्रवीण तरडे खूप रॉयल व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या पत्नीसाठी प्रवीण तरडे सोशल मीडियावर बऱ्याचदा रोमँटिक पोस्ट लिहितात. कारण त्यांची प्रेमकहाणी आहे. त्यांनी आधी प्रेम आणि मैत्री मग लग्न. या दरम्यान अनेक कामे केली. एकमेकांना जीव लावला. पुरुन उरले.

75486026 2969327439753265 8246863247324479488 o

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की त्यांचे नेमके लग्न कधी झालं ? अहो या लव्ह बर्ड जोडीचे लग्न २ डिसेंबर २००९ साली झाले. त्यांची सुरुवातीची परिस्थिती खूप हलाखीची होती. म्हणजे काय लगेच यश नाही मिळाले. खूप संघर्ष करून ही यशाचे आयुष्य पदरी आहे. दोघा नवरा बायकोनं दहा-बाय-दहाच्या खोलीत सुरु झालेला संसार होता. प्रवीण तरडे म्हणतात तो तू थ्री बीएचकेसारखा मिरवलास. मग तुझ्याच पायगुणामुळे नंतर सगळे चित्रच बदलले, अशा शब्दांत प्रवीण तरडे यांनी पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. किती प्रेमळ आणि जीव लावणारा माणूस. एकमेकांना जीव लावला तर आयुष्य खूप सुखद जातं.

आता बघा म्हणजे आपल्याला वाटत असेल की त्यांची बायको या क्षेत्रात नाही तर ते चुकीचं आहे. प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहेत. स्नेहल यांनी प्रवीण तरडे यांच्यासोबत काही नाटकात काम केले आहे जेव्हा ते पुण्यात वेगवेगळ्या स्पर्धा करायचे. तेव्हापासून सोबत आहे हे कपल. म्हणून एवढं एकमेकांना प्रेमात बांधील आहे.

See also  "लग्नाची वाईफ वेडिंगची बायको" मालिकेतील या अभिनेत्याने थाटला दुसरा संसार; लवकरच करणार या अभिनेत्री सोबत लग्न...

Pravin tarde wife

तेही आनंदाने. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्याचबरोबर स्नेहल यांनी प्रवीण यांच्यासोबत सोबत काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यात, देऊळबंद, चिंटू २ आणि व्हें’टिलेटर या चित्रपटांचा समावेश आहे. स्नेहल तरडे या खरचं उत्तम अश्या अभिनेत्री आहेत. फक्त आता आपल्या नवऱ्याला ढाल बनून साथ द्यायची हे त्यांनी ठरवले आहे. म्हणून कदाचित त्या अभिनयाचा विचार करत नसतील. अश्या प्रेम जोडीला पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. येत्या काळात येणारा हंबीरराव हा चित्रपट त्यांचा खूप गाजू.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment