मराठी अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी सुद्धा आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सिनेसृष्टीत, नाटकात काम करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडते की अनेक अभिनेते अभिनेत्री यांना सोबत काम करताना मैत्रीची ओळख होते. मग हेच मैत्रीचं नातं पुढं प्रेमाचं रूप धारण करतं. आणि काही पुढे लग्नापर्यंत जातात. असे अनेक कपल्स चं उदाहरण आपण घेऊ शकतो.

कारण वाचणारा चाहता वर्ग असतो. आणि त्याला हे सगळं जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आपल्याला अंकुश चौधरी ( ankush choudhri ) माहिती असेल. कुणाला नसेल. तो फेमस हिरो आहे. तर त्याची बायको सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कोण आहे हे जाणून घेऊयात चला.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने ( ankush choudhri ) विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अंकुश त्याच्या पर्सनल लाइफबद्दल फारसा बोलताना कधी दिसत नाही. फार कमी लोकांना माहित असेल की अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ( deepa parab – choudhari ) ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दीपाने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ती स्टार प्लस वाहिनीवरील मालिका शौर्य और अनोखी की कहानीमध्ये पहायला मिळते आहे.

See also  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 93 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास

66545356

दिग्दर्शक केदार शिंदेच्या ( kedar shinde ) ऑल द बेस्ट ( all the best ) या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. तसेच तिने ‘थोडी ख़ुशी थोडा गम’, ‘छोटी मॉ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदी मालिकेतही काम केले आहे.

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर दिपाने अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे. स्टार प्लस वाहिनीवरील मालिका शौर्य और अनोखी की कहानीमध्ये सध्या ती काम करताना दिसते.

df05638a02f6accf026cbf8a81b5c97f

तिने सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केल्यापासून ती सोशल मीडियावरही सक्रीय झाली आहे. ती तिचे मालिकेतील फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसते. तिच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

See also  'छत्रपती ताराराणी' यांच्यावर आधारित चित्रपटात छत्रपती ताराराणी साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री...

अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केले आणि त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. दिपा लग्नानंतर फारच कमी चित्रपटात पाहायला मिळाली. शेवटची ती अंड्याचा फंडा या सिनेमात पहायला मिळाली होती.

Cc 3gflWoAAOgMO

तर अंकुशच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो लवकरच लकडाउन या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दिपा आणि अंकुश सध्या सुखी समृद्ध आयुष्य जगत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. काळजी घ्या सुरक्षित रहा. वाचको हो तुम्ही सुद्धा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment