अभिनेते अरुण कदम मुलीचा नुकताच झाला साखरपुडा, साखरपुड्याचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
मराठी मनोरंजन क्षेत्रात आपल्या हास्यमय अभिनयाच्या क्षमतेने प्रेक्षकांवर राज्य करणारा एक अवलिया अभिनेता आपल्याला माहिती असेलच. जे मराठी चित्रपट मालिका मधील एक सुप्रसिद्ध असे विनोदी अभिनेते आहेत. ज्यांच्या कोकणी भाषेचा लहेजा हा आज जगभर फेमस झालेला आहे. त्या अभिनेत्याचे नाव आहे अरुण कदम. होय ! अरुण कदम सारखा अवलिया अभिनेते इंडस्ट्रीत दुसरे कुणीही नाही. आज घराघरात जाऊन प्रेक्षकांना चिंतामुक्त करून हसवण्याचे खूप मोठं काम अरुण कदम करत आहेत.
अरुण कदम यांना आपण अनेक कार्यक्रमातून पाहिलेलं आहे. ते म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारखे इतर अनेक कॉमेडी शो. ज्या मधून अरुण कदम यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांच्या कोकणी आगरीकोळी भाषेतील बोलणे प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाले आहे. त्याच सोबत काही चित्रपट ही त्यांनी केलेले आहेत.
घंटा, सासूबाई गेल्या चोरीला, शिनमा, लोणावळा बायपास या मराठी चित्रपटासोबत त्यांनी दिला तो बच्चा है जी, चलता है यार, थँक्स माँ या हिंदी चित्रपटातही आपल्या विनोदी अभिनयाची छाप पाडली. अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली कदम आहेत. अरुण कदम यांचे सुखी समृद्ध असे आनंददायी आयुष्य चालले आहे.
तर आपण म्हणाल की अरुण कदम हे आहेतच सुप्रसिद्ध अभिनेते; पण आज अचानक त्यांची आठवण कशी ? तर कोणत्याही गोष्टीला कारण असतं. प्रसिद्ध अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाल्याचे कळत आहे. त्यामुळे आपल्याला संगे आमचे कर्तव्य आहे. कारण काय होतं की ज्या अभिनेत्याला आपण छोट्या पडद्यावर खूप लाईक करतो त्यांच्या बद्दल खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता ही खूप लागून राहिलेली असते. त्यांची एकुलती एक मुलगी असलेली सुकन्या चा साखरपुडा पार पडलेला आहे. त्यानिमित्ताने माहिती सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
तर अरुण कदम सारख्या दिग्गज हास्य सम्राट अभिनेत्याची एकुलती एक मुलगी सुकन्या ही सागर पोवळे यांसोबत विवाहबद्ध होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या या दोघांच्यात साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तिची आणि होणाऱ्या नवरया सोबतच मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती दिसून येत आहे.
आता वडील इंडस्ट्री मध्ये दिग्गज सेलिब्रिटी असल्याने इंडस्ट्री त ले अनेक कलाकार उपस्थित होणार होतेच. सुकन्याच्या साखरपुडा सोहळ्याला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली पाहायला मिळते आहे. व्हायरल झालेल्या फोटो मध्ये दिसतच आहेत. त्यासोबत अरुण कदम यांचे हास्य जत्रा शो मधील सगळे सहकारी सुद्धा हजर होते. मित्राच्या मुलीच्या आनंद सोहळ्यात. सुप्रिया पठारे, जयवंत वाडकर यांनी देखील हजेरी लावली होती. अरुण कदम यांनी मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे शिवाय तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. तर तिला तिच्या या नव्या वैवाहिक आयुष्याच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.