‘बाई वाड्यावर या….’ असं म्हणणाऱ्या निळू फुलें यांच्या आयुष्यातील ह्या गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीतील राजा म्हणा, सुपरस्टार म्हणा किंवा बादशाह म्हणा. परंतु यांच्या कणखर आवाजात अशी जादू होती की रसिकांच्या हृदयावर यांची छाप अगदी जबरदस्त उमटायची. हे दिग्गज प्रखर व्यक्तिमत्त्व म्हणजे दुसरं- तिसरं कुणी नसून आपले सर्वांचे लाडके निळू फुले. निळू फुले यांच्या राहणीमानात, आवाजात व नजरेत एक असा पुरूषी रुबाब होता की ते जेव्हा वेगवेगळ्या गावी जायचे. तेव्हा तेथील शिक्षिका, नर्स ह्या त्यांच्यापासून चार हात दूर राहायच्या. हेच त्यांच्या अभिनयाचे खरे सामर्थ्य होते.

मराठी सिनेसृष्टीतील हे दिग्गज कलाकार अभिनेते निळू फुले यांचा जन्म 1930 मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या घरात एकूण 11 बहीण भावंडे, त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशांवर आपला घरगाङा चालवत असत. लहानपणापासूनच निळूभाऊ हे खूप खोङकर होते. आपल्या बहिणींची ते खूप खोड काढायचे पण तितकाच त्यांना जीव पण लावत असत.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पहिल्या बायकोचे बो'ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

अभिनयाची चुनूक तर निळू भाऊंना अगदी लहानपणापासून होती. आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 1957 मध्ये “येरा गबाळयाचे काम नोहे” हे लिहिले होते. त्यानंतर पु.ल. देशपांडे यांच्या नाटकात रोंगें ची भूमिका साकारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक नाटकं व चित्रपटांत त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली.

सिंहासनामधील पत्रकार आणि विनोदी भूमिका सुद्धा त्यांनी खूपच छान साकारल्या. त्यांच्या सिनेमात एकतरी बलात्काराचा सीन हा आवर्जून असायचा. त्यावर विनोद करताना निळूभाऊ नेहमी म्हणायचे की, “कथा तर तीच, बाई सुद्धा तीच आणि बलात्कार देखील तोच…कमीत कमी तिची साङी तरी बदला हो…”

मित्रांनो तुम्हांला माहित आहे का हो, निळू फुले यांनी आपल्या कारकीर्दीत 250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये आपल्या उत्कृष्ट भूमिका साकारल्या. परंतु रंगभूमीवर काम करताना मात्र त्यांचा आनंद हा काही वेगळाच असायचा. “सखाराम बाईंङर” या नाटकातील त्यांच्या सखाराम या भूमिकेने त्यांना अगदी यशाच्या शिखरावर पोहोचवलं. तर याच नाटकाला अमरीश पुरी यांनी हिंदी मध्ये साकारण्याचा प्रयत्न केला. पण निळू भाऊंसारखी कला मात्र त्यांना देखील जमू शकली नाही.

See also  "या सुखांनो या" या लोकप्रिय मालिकेतील ती चिमुरडी बघा आता कशी दिसते, फोटो पाहून थक्क व्हाल!

अभिनयाची आवङ जोपासताना निळू फुले यांनी समाजासाठी देखील बरेच कार्य केले. सेवादलातील आपल्या नोकरीतील कमाईचा 10 टक्के वाटा समाजासाठी, सेवादलाच्या उपक्रमांसाठी देण्याचा नियम त्यांनी सचोटीनं पाळला. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो… अशा या माणुसकी जपणाऱ्या, भावनाशील अशा या अभिनयाच्या दिग्गज कलाकाराने 13 जूलै 2009 रोजी शेवटचा श्वास घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment