लोकप्रिय मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांची पत्नी कोण आहे माहितेय का? फिल्मी दुनियापासून आहे दूर..
आज मराठी, तेलगू, हिंदी किंवा इतर अनेक भाषांच्या इंडस्ट्रीत जे काही सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री काम करत आहेत त्यांच्या आयुष्यातील साथीदार हा काही अभिनेता किंवा अभिनेत्री च आहे असं नाही आहे.
एक मराठी कलाकार असा आहे ज्यांनी अनेक भाषांत काम केलेले आहे. आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे. त्यांची पत्नी ही लाईम लाईट पासून खूप दूर आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ते अभिनेते कोण आणि त्यांची पत्नी कोण ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.
लोकप्रिय मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे ( sayaji shinde ) यांनी मराठीच नाही तर तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक सिनेमात काम केले आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सयाजी शिंदे यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच ते सामाजिक कार्यातही सहभाग घेताना दिसतात. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या पत्नी आणि मुले लाइमलाईटपासून दूर आहेत. त्यांची पत्नी खूप सुंदर आहेत.
सयाजी शिंदे ( sayaji shinde ) यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याजवळील वेळे-कामती नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला. सयाजी यांनी मराठी भाषेत कला विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागाचा नाईट वॉचमन म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांच्या करिअरची सुरूवात केली. त्यांना रुपये १६५ दरमहा पगार दिला होता. पहारेकरी म्हणून सेवा बजावताना नाट्यगृहाची आवड निर्माण झाली आणि अभिनयाची आवड त्यांना थिएटर आणि चित्रपटांकडे ओढू लागली.
सुरुवातीच्या संघर्षमय कालावधीनंतर ते मुंबईत गेले. सयाजी यांनी १९७८ मध्ये मराठी एकांकिका नाटकातून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. १९८७ मध्ये झुल्वा नावाच्या मराठी नाटकात त्यांचा अभिनय चांगलाच गाजला आणि तेव्हापासून त्यांना लोकप्रियता मिळू लागली. त्यानंतर त्यांनी इतर भाषांमध्येही अभिनय करण्यास सुरुवात केली.
१९९५ साली अबोली हा अभिनेता म्हणून त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यांनी बऱ्याच मराठी नाटकात काम केले आहे. त्यापैकी सखाराम बाईंडर यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते.
झुल्वा, वन रूम किचन आणि आमच्या या घरात ही नाटके त्यांची गाजली. त्यानंतर त्यांनी बर्याच मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यापैकी गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात कृषिमंत्री म्हणून त्यांची भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली. सयाजी शिंदे यांनी बऱ्याच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.
सयाजी शिंदे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे ( alka shinde ) आहे आणि त्यांना सिद्धार्थ नावाचा एक मुलगा आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा लाइमलाईटपासून दूर राहतात. मात्र त्यांचे सोशल मीडियावर फोटो पहायला मिळतात.
तर असे अनेक उदाहरणे आहेत. अनेक अभिनेत्याची पत्नी वेगवेगळ्या क्षेत्राततली आहे तर काहींचे पती अभिनेते नाहीत. आज पुरती एवढीच माहिती. पुन्हा भेटूया नव्या माहिती सोबत. तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.