“तुझी प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते…” प्रिय पत्नीसाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ही रोमॅन्टिक पोस्ट तुम्ही पाहिलीत का…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेही सोशल मीडियावर आपल्या रोमॅन्टिक फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याच्या प्रेमाचा गोडवा काय आहे, ते आपल्याला फोटोज् मधून समजते. तुमचा देखील विश्वास बसणार नाही, त्यासाठी सिद्धार्थ चांदेकरची ही पोस्ट तुम्ही वाचू शकता.

तुझी प्रत्येक गोष्ट आवडते….असे म्हणत सिद्धार्थने आपल्या लाडक्या बायकोसाठी ही पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट पाहून तर मिताली सुद्धा अगदी हुरळून जाईल. यामध्ये सिद्धार्थने लिहिले आहे की…मला तुझी प्रत्येक गोष्ट आवडते. तू हसत असताना मला तुझ्याकडे पाहायला खूप आवडते. पाणी पित असताना चुकून ते अंगावर सांडले की तू किती गोड केविलवाणा चेहरा करतेस….मला तर खूप आवडते…स्वतःच्या तंद्रीत असताना काहीतरी विसरलेलं अचानक जेव्हा तुला आठवतं…ते सांगतानाचा तुझा उत्साह खूप भारी असतो.

See also  या मराठमोळया अभिनेत्रींनी चाहत्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा अशाप्रकारे...

Untitled design 2021 03 26T120754.426

जर कुणी तुझी मस्करी केली, तर तू कसा बिचारासा चेहरा करते…मला तर तो खूप आवडतो…मी बोलत असताना कशी एकटक लावून पाहते, तेव्हा मी तर सारे शब्दच विसरून जातो…कारण बोलण्यापेक्षा तुझे ङोळे पाहायला मला भरपूर आवडते…मी तुझ्याकडे पाहत असताना जेव्हा तू हळूच पकडते आणि विचारते की, “काय रे ?” असे विचारते ना..ते पण मला जबरदस्त आवडतं.

खरं सांगू मला तुझा चिङका चेहरा पण फार आवडतो. सॉरी हा..पण तू तर रडताना पण अतिशय सुंदर दिसते..तू हसत असताना मला तुझ्याकडेच पाहत बसावसं वाटतं…सुंदर साङी नेसून, टिकली लावून तर तू माझ्या समोर येऊ नकोस गं…माझे लक्षच लागत नाही मग कशातच…इतकंच नव्हे एवढं सगळं करून जेव्हा तू वर मला विचारते की, मी आता कशी दिसते…कसे गं उत्तर देऊ मग मी तुला…तुझे ङोळे, तुझे हसणे, तुझे तर सगळेच आवडते गं मला…खरंच. अशा मनमोहक शब्दांत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या प्रिय पत्नीच्या सौंदर्याचे वर्णन केले आहे. जे वाचून प्रत्येकालाच खूप छान वाटेल.

See also  'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने केवळ 19 व्या वर्षी खरेदी केली महागडी कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment