बॉलीवूडमधे रावडी गुं’ड “मंग्या” च्या ख’त’रनाक भूमिकेत “हा” तगडा मराठमोळा अभिनेता करतोय दमदार एन्ट्री, लुक पाहून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

तमाम मराठी रसिक आणि विशेषतः तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला तगडा मराठमोळा अभिनेता आता एका नव्या आणि ख’त’र’ना’क लुकसह बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करतोय. त्या अभिनेत्याचे नांव आहे सुयश टिळक.

शुक्रवार २ ऑक्टोबर २० ला इशान ख’ट्टर आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘खाली पीली’ या हिंदी चित्रपटात सुयश ‘मंग्या’ नावाच्या गुं’डांची भूमिका साकारतोय. त्याला ही भूमिका कशी मिळाली याबद्दल एक प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुयश म्हणाला, “टेलिव्हिजन वरील एका मराठी मालिकेत कास्टिंग टीमने मला पाहिलं होतं. त्यांना माझा लूक आवडल्याने, मला ऑडिशनसाठी बोलावलं. तब्बल तीन वेळा ऑडिशन्स आणि लूक टेस्ट दिल्यानंतर फायनली माझ्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं.”

या चित्रपटात सुयश व्हिलनची भूमिका साकारत आहे. मंग्या नावाच्या गुं’डाची ही भूमिका आहे. सुयश सांगतो की, “या चित्रपटाचं चित्रीकरण सलग झालं नव्हतं. चित्रीकरण अनेक महिने सुरू असल्यामुळे दरम्यानच्या संपूर्ण काळात मला माझं वजन आणि लूक, तसाच ठेवायचा होता.

See also  अचानक बॉलीवूड मधून गायब झाली 'धडकन' चित्रपटातील ही अभिनेत्री, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...

त्यातही बहुतेक सगळे ऍक्शन सीनच असल्यामुळे धावपळही खूप होती. फिल्म मधला माझा लूक आणि वजन यामध्ये सातत्य ठेवणं महत्वाचं आणि गरजेचं होतं. आणि तेच सर्वांत जास्त आव्हानात्मक होतं. पण फिल्मच्या संपूर्ण टीमने यात मदत केली,”

फिल्मचा हिरो इशान आणि हिरोईन अनन्यासोबत काम करतांनाच्या अनुभवाविषयी बोलतांना सुयशने सांगितले की, “इशानचे अभिनयावर फारच प्रेम आहे. आपल्या रोलवर त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रीत असायचं. तसेच बाकी सर्वांची दृश्येही तो आवर्जून पाहायचा.

माझाही पहिला सीन शू’ट होत असताना इशान सेटवर माझं काम पाहण्यासाठी आला होता. मला त्याचं फार अप्रूप वाटतं. चित्रीकरण संपल्यावर तो मला भेटला आणि काम चांगलं झाल्याचं सांगत कौतुक देखील केलं.” सुयशचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आणि त्यातही भाषेचा फरक यांमुळे, थोडं दडपण होतं. मात्र इशानने संपूर्ण चित्रीकरणादरम्यान फार मदत केल्याचंही त्याने सांगितलं.

See also  समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव "दाऊद" असे म्हणत नवाब मलिक यांनी केले वानखेडेंवर आरोप...

“अनन्या पांडेसोबतही काम करण्याचा अनुभव चांगला होता. तिचे मुळात इतर हिरोईन सारखे कुठलेही नखरे नव्हते. सुप्रसिद्ध कलाकार जयदीप अहलावत यांच्यासोबत माझी काही दृश्ये होती. एका सीननंतर त्यांनी मला येऊन मिठीच मा’र’ली,” अशा शब्दांत सुयशने त्याचा अनुभव सांगितला.

“माझा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असल्याने तो मोठ्या पडद्यावर पाहण्याची माझी खूप इच्छा होती. ते माझं स्वप्न होतं. त्यात एक वेगळीच मजा असते व त्यासाठी मी खूप उत्सुक होतो. पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही म्हणून चित्रपट O T T प्लॅटफॉर्म वर रिलीज याची खंत वाटतेय,” असं तो म्हणाला. सध्या लोकप्रिय असणाऱ्या वेब सिरीज विषयी तो म्हणतो की, “वेब सीरिजमध्ये काम करायला मला नक्की आवडेल. कुठल्याही भूमिकेच्या चौकटीत मला कधीच राहायचं नाहीये. मला सगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला आवडतील.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री सोबत लग्न करणार होता अभिनेता अभिषेक बच्चन, पण आई जया बच्चनने ऐनवेळी...

‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश टिळकला खूप प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतून तो घराघरामध्ये पोहचला होता. आता सुयश टिळकची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत सुयश टिळक आणि सायली संजीव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment