अभिनयाबरोबरच मोठमोठे व्यवसाय देखील करतात हे प्रसिद्ध मराठी कलाकार, अभिनेत्रीचा तर आहे स्वतःचा फॅशन ब्रँड…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

कोण म्हणतं मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही म्हणून? काय आहे व्यवसाय सुरु करणं आणि तो टिकवणं… तसं पाहिलं तर हे कष्टाचं आणि जिकिरीचं काम. ते म्हणतात ना की, नोकरी म्हणजे आठ तासांचा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे चोवीस तासांची नोकरी.

स्वतःचा व्यवसाय करणाऱ्याला कधीच सुट्टी नसते, व्यवसायात मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळविण्याचे, नफा-नुकसानीचे टेन्शन असते. कित्येक व्यावसायिक आनंदानं हे काम करतात, अगदी मराठी चित्रपट, मालिकेतील सेलिब्रिटीजसुद्धा अभिनयासोबत काही प्रसिद्ध फूड्स अँड फॅशन ब्रँड्स चे मालक आहेत. जाणून घेऊयात अशाच काही उद्योगी सेलिब्रिटी मंडळींना…

द बॉम्बे फ्राईज : आताच्या आधुनिक खाद्य संस्कृतीमध्ये फ्राईजचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. नसावा. कसं शक्य आहे. मराठी मालिका स्वराज्यरक्षक संभाजी मधील अतिशय लोकप्रिय मराठमोळी जोडी म्हणजे शंतनू मोघे आणि प्रिया मराठे.

See also  तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचे पुढे नेमकं काय होतं? पाहून विश्वास बसणार नाही...

शंतनू यांनी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची तर प्रियाने गोदावरीची भूमिका साकारली होती. या जोडीच्या मालकीचा कॅफे “द बॉम्बे फ्राईज”असून, हा कॅफे अल्पावधीतच चोखंदळ खवैय्यांच्या पसंतीस उतरला आहे. इ

थे खवय्यांना विविध प्रकारचे टेस्टी फ्राईज, रिफ्रेशमेन्ट ड्रिंक्स मिळतात. कॅफेचे इंटिरियर डेकोरेशन इतके चित्ताकर्षक आहे की उत्तम चवदार खाण्यासोबतच मिळणाऱ्या प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणामुळे खाण्याचा आनंद द्विगुणित होतो.

हंसगामिनी : डिझायनर कपडे आणि त्यातही साड्या म्हणजे समस्त महिलावर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय. हाच जिव्हाळ्याचा धागा पकडून अजून एका सेलिब्रिटीच्या डिझायनर साड्यांच्या ब्रँड ची ओळख करून देतोय. हा ब्रँड आहे हंसगामिनी.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या पत्नी आणि आपल्या लाडक्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा हा ब्रँड आहे. निवेदिता सराफ स्वतः हंसगामिनीच्या अनेक साड्यांचं डिजाईन करतात.

त्यांनी स्वतः या साडी डिझायनिंग मधील तांत्रिक बाबी अवगत करून घेतल्या आहेत. आणि डिझायनिंग सोबतच त्या या ब्रॅंडचे प्रमोशनही करतात. आपल्या मैत्रिणीसोबत त्यांनी या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती घेऊन सुरुवात केली. आपल्या मेहनतीने आणि कामावरील श्रद्धेने त्यांनी हा ब्रँड नावारूपाला आणला आहे.

See also  देवदेवतांच्या जुन्या फोटो आणि मूर्ती यांचे वि'स'र्ज'न यथायोग्य शा'स्त्री'य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या सविस्तर...

तेजाज्ञा : तसा नावावरून अंदाज आलाच असेल पण तरीही सांगतो की, एकमेकींच्या अगदी जिवलग मैत्रिणी असलेल्या मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांचा हा डिझाइनर कपड्यांचा ब्रँड. एयर होस्टेस असलेली अभिज्ञा नंतर अभिनेत्री झाली.

नंतर तिची आणि तेजस्विनीची मैत्री झाली आणि मग पुढे या दोघींनी मिळून डिजायनर कपड्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. तेजाज्ञा हे दोघींच्या नावाचा समावेश असलेले नावच त्यांनी आपल्या व्यवसायाला दिले. या ब्रँड अंतर्गत, डिजायनर कपड्यांना जास्तकरून प्रमोट करतात. अगदी साड्या, ड्रेसेस ते थेट त्यांच्या बहुचर्चित डिझायनर मास्क पर्यंत सगळे प्रमोट केलं जातं.

पिझ्झा बॉक्स :  पिझ्झा म्हटलं कि आजकालच्या तरुण पिढी सोबतच आताच्या जेष्ठांच्याही तोंडाला पाणी सुटते. सुप्रसिद्ध मराठी गायिका वैशाली सामंत यांच्या मालकीचा पिझ्झा बॉक्स हा पिझ्झा ब्रँड आहे.

See also  शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर आश्विन कृष्ण तृतीयेस धनत्रयोदशी, जाणून घ्या व्रतकथा, मंत्र, पूजनविधी आणि नियम...

आपल्या तीन मैत्रिणींसोबत त्यांना ही व्यवसायाची कल्पना सुचली. यंग जनरेशनला डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा पदार्थ निवडला असला तरी, पिझ्झा म्हटलं कि सगळेच खुश असतात. त्यांच्या पिझ्झा बॉक्स ब्रँडला खवय्ये आणि सेलेब्रिटीजनी पसंती दिलेली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment