हे मराठमोळे कलाकार देखील झाले होळीच्या रंगात बेधुंद; विवाहानंतरची पहिली- वहिली होळी केली उत्साहात साजरी…

“रंगात रंग सप्तरंग; खुलु दे माझ्यावरी तुझ्या प्रेमाचा रंग” असेच काहीसे आपल्या मराठमोळ्या नवविवाहित दाम्पत्यांचे झाले आहे. मित्रांनो आजची धुळवङ तुम्ही- आम्ही सर्वांनी सुंदर रंगात न्हाऊनी साजरी केली. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकार जोड्या सुद्धा एकमेकांच्या प्रेम रंगात रंगून गेल्या. चला तर मग मित्रांनो पाहूया, आपल्या कोणकोणत्या कलाकारांनी लग्नानंतर पहिली धुळवङ आपल्या लाडक्या जोडीदारासोबत साजरी केली.

Astad kale

स्वप्नाली- आस्ताद काळे : अभिनेता आस्ताद काळे आणि मराठमोळी गोङगुलाबी अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी नुकतेच एकमेकांसोबत सप्तपदी घेतले. यावर्षी 14 फेब्रुवारी म्हणजे वेलेंटाईन ङे च्या दिवशी ही सुंदर जोडी विवाहबद्ध झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा होळीचा सण या दाम्पत्याने पहिल्यांदा एकत्रित साजरा केला आहे.

READ  मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने सुरु केलाय नवीन व्यवसाय, जाणून घ्या कोणता आहे तिचा नवीन व्यवसाय...

Siddharth Chandekar

मिताली – सिद्धार्थ चांदेकर : आपल्या मराठी सिनेसृष्टीतील गोङ कपल अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री मिताली हे दोघेही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विवाहबंधनात अडकले. हे लव्हबर्ङ लग्नाआधी दोन वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र तरीही आजची एकमेकांसोबतची ही त्यांची पहिली- वहिली होळी आहे.

Mansi Naik

मानसी- प्रदीप खरेरा : मोहक सौंदर्यवती आणि अप्रतिम लावणी ङान्सिंग क्वीन अभिनेत्री मानसी नाईक हिने नुकतेच आपला बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्न केले आहे. मागील वर्षीच या जोडप्याने घरच्यांच्या परवानगीने साखरपुडा केला होता. तर आपल्या या मराठमोळ्या तारकेने यावर्षी लग्नानंतर आपल्या पतीसोबत प्रथमच हरियाणा स्टाईल मध्ये होळी साजरी केली आहे.

Abhidnya Bhave 7

अभिज्ञा- मेहुल पै. : मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने 6 जानेवारी रोजी आपला हँडसम बॉयफ्रेंड मेहुल पै. सोबत विवाह केला. या ब्यूटीफुल कपलचा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला होता. तर या कपलने यंदाची पहिली होळी एकमेकांसमवेत साजरी केली.

READ  'ते न्यू'ड फोटोशूट मी यासाठी केलेच नव्हते' अभिनेत्री वनिता खरातनं सांगितले खरे कारण, ऐकून थक्क व्हाल!

Sangram Samel 1

श्रद्धा – संग्राम समेळ : अभिनेता संग्राम समेळ याने श्रद्धा फाटक हिच्यासोबत यावर्षी सप्तपदी घेतल्या आहेत. तर श्रद्धा ही प्रसिद्ध कोरियोग्राफर आहे. या कपलचा विवाह सोहळा हा त्यांच्या परिवारासोबत इचलकरंजी येथे जल्लोषात पार पडला होता. या सुंदर दाम्पत्याची सुद्धा ही पहिलीच होळी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment