ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात… लग्नाचे फोटोज् तुफान व्हायरल… बघा ही अभिनेत्री आहे तरी कोण…?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आदितीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु आता नुकताच ६ जुलैला अमृता पवारचा शाही विवाह सोहळा देखील पार पडला आहे.

अमृताने नील पाटील यांच्याशी लग्न केले. आणि या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडिया वर चांगलेच व्हायरल होत आहेत. अमृता पवारने लग्नात पिवळी नऊवारी साडी परिधान केली होता. सोबतच तिच्या हातात हिरवा चुडा आणि डोक्याला बाशिंग बांधलेल्या वधूच्या पोशाखात अमृता कमालीची सुंदर दिसत होती.

तिचा पती नीलही राजबिंडासारखा दिसत होता. अग्नीला साक्षी मानून अमृता आणि नीलचे लग्न झाले. अमृता आणि नीलच्या लग्नाला अनेक टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. यापूर्वी अमृताचे मेहंदी आणि हळदीचे फोटो सुद्धा व्हायरल झाले असल्याचे बघायला मिळाले होते.

See also  "दे धक्का" मधील चिमुकल्या गौरीला पाहिलं का ?... आता झालीय इतकी मोठी.... दिसते खूपच सुंदर...

अमृताने हळदीसाठी गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. आणि तिला फुलांच्या दागिन्यांनी सजवले होते. मात्र सर्व दागिन्यांमध्ये तिचे कानातले अतिशय खास होते. कारण त्यावर दुल्हनिया असे लिहिलेले होते. 4 एप्रिलला अमृता आणि नीलचा साखरपुडा पार पडला होता. त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अमृताचे पती नील पाटील यांचा अभिनय क्षेत्राशी काहीही संबंध नाही आणि ते इंजिनिअर आहेत. ‘तूझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अमृता अदितीची भूमिका साकारत आहे, जी आई, वडील आणि आईची लाडकी लेक या त्रिकोणी कुटुंबातून 50 जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आली आहे. ही मालिका आदिती आणि सिद्धार्थच्या वेगवेगळ्या कौटुंबिक जगावर आधारित आहे.

या मालिकेत अमृताने तिच्या आदितीच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘तुझ्या माझा संसाराला आणि काय हवं’ या मालिकेव्यतिरिक्त अमृताने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ मालिकेत जिजामातेची भूमिका साकारली होती. या भूमिकेला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अमृता सीएच्या हाताखाली अकाउंटंट म्हणून काम करत होती.  त्यानंतर तिने मराठी मालिका ‘दुहेरी’मधून अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली.

See also  "ये लाल इश्क ! मलाल इश्क !" असे म्हणत शेयर केलेले रिंकू राजगुरूचे फोटो तुफान व्हायरल...
Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment