अभिनेत्री गायिका केतकी माटेगावकरचा जीवन प्रवास !
हम गरीब हुये तो क्या हुवा ? दिल से अमीर हैं अमीर. हम काले हुई तो क्या हुवा ? हम तेरे तेरे चाहने वाले है. सहा वर्षांपूर्वी अश्या डायलॉग असणाऱ्या टाईमपास या मराठी चित्रपटाने प्रचंड पैसा कमवला होता. रसिक प्रेक्षकांच्या मनाला टाइमपास ने इतकी भुरळ पाडली की लोकं दोनदा – तीनदा करून थियटर मध्ये जाऊन पाहू लागले. सर्वांत जास्त पैसे कमावणाऱ्या चित्रपटामध्ये त्यानं प्रथम बाजी मारली होती. लोकांना त्यांच्या आसपासच्या प्रेमाच्या गोष्टी तेव्हापासून खूप आवडू लागल्या. दगडू प्राजूची जोडी सुपरहिट ठरली. दगडू प्रथमेश परब ने तर प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकर ने साकारली. केतकी माटेगावकर एक हरहुन्नरी गायक अभिनेत्री आहे. तिचा आवाज न अभिनय दोन्हीही खूप गोड आहे. टाईमपास मध्ये तिनं काही गाणी सुद्धा गायलेली आहेत. ते खूप हिट झाले होते.
केतकी माटेगावकरचा जन्म नागपूर मध्ये झाला. तिला लहानपणीपासूनच संगीताची खूप आवड होती. आई सुवर्णा माटेगावकर एक उत्कर्ष गायक असल्यामुळे घरूनच तिच्या गायनाचे बीज रुजत गेले. वडील पराग माटेगावकर यांनी सुद्धा तिच्यावर या क्षेत्रात येण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावली. झी मराठी आयोजित झी सारे गम प लिटिल चॅम्पियनशिप मध्ये तिनं सहभाग घेतला. तिथं तिच्या आवाजाची जादू खूप चालली. पण काही कारणास्तव तिला स्पर्धा संपण्याच्या आधीच बाहेर पडावं लागलं.
२०१२ मध्ये तिच्या अभिनय कारकीर्द सुरु झाली. मिलिंद बोकील यांच्या कादंबरिवर आधारित आणि सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटात तिनं शाळेतील एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलीची भूमिका केली. पुढं महेश मांजरेकर यांचा काकस्पर्श मध्ये तिचा चांगलाच जम बसला. लहानपणीचं अनेक दिग्गज कलाकार यांच्यासोबत काम करण्याची तिला संधी मिळत होती. अभिनय शिकायला बळ मिळत होतं. केदार शिंदे दिग्दर्शित तानी मध्ये मात्र तिला मिळालेल्या प्रमुख भूमिकेचं तिनं सोनं करून टाकलं. सर्वसामान्य मुलीचं कलेक्टर पर्यंत जाऊन पोहचणे हे तिनं खुप उत्तम प्रकारे अभिनयात उतरवलं. पण खरं आयुष्य बदललं ते २०१४ मध्ये रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास या चित्रपटाने. यामध्ये तिची भूमिका प्रचंड गाजली. तिला खरी ओळख टाइमपास मधून मिळाली.
बहुतेक चितपटात केतकी नं स्वतःच्या आवाजात गाणी गायलेली आहेत. तिचा नाजूक आवाज गोड आवाज, निरागस दिसणं हे सगळं खूप मनमोहक आहे. ती जेवढी चेहऱ्यावरून साधी दिसते तितकी स्टायलिश सुद्धा आहे. फुंतरु मध्ये तिची दिलखेच अदा, सोशल मीडियावर फोटो मध्ये दिसणारी बिनधास्त केतकी हे सगळं न बोलता सांगून जाते. केतकीचा आवाज म्हणजे एक सुरेल मैफिलच. तिनं अनेक कार्यक्रम मध्ये लाईव्ह गाण्यांचे परफॉर्मन्स केलेले आहेत. किशोरी आमोणकर यांनी संत तुकाराम मध्ये अजरामर केलेलं ” बोलवा विठ्ठल ” हे गाणं तिच्या आवाजात खूप व्हायरल झालं होतं.
फेसबुकच्या पेज वर ती सतत कार्यरत असते. तिची दिलदार, बिनधास्त, बोल्ड अदा ती इंस्टा, फेसबुक आणि ट्विटर यांवर फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त करत असते. तिने अनेक नाटकांमधून सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. तिनं आवाजाची छाप हिंदी आणि तेलगू मध्येही सोडलेली आहे.
सध्या करोना मुळे लॉकडाउन मध्ये ती रियाज आणि स्वतःवर काम करत आहे. कारण ती असं म्हणते की ” इतक्या वर्षांतून इतका मोकळा वेळ मिळाला आहे. त्याचं सोनं केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. तिचे पुढील प्रोजेक्ट सुद्धा काही दिवसांनी रसिकांच्या भेटीला येणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आणि माहिती मिळवण्याची शोधाशोध सध्या तिची चालू आहे.
२२ फेब्रुवारी पराग – सुवर्णा माटेगावकर यांच्या नागपूर मधील घरात जन्माला आलेली मुलगी केतकी इतकं नाव मोठं करेल असं कुणालाही वाटलं नसेल. पण म्हणतात ना की ” मूर्ती लहान पण कीर्ती महान ” तिचं या वयात मिळवलेलं यश पुढील आयुष्यात नक्कीच यशाचं शिखर गाठून देईल यात तिळमात्र शंका नाही.