या मराठमोळ्या अभिनेत्रीने उचलले पाऊल, तिच्या या कार्याला कराल तुम्हीपण सलाम, जाणून घ्या तिच्या कार्याची गाथा…

मागील वर्षभरापासून जगभरात महामारीचा शिरकाव झाला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमार्फत अनेक उपाययोजना आणि मदत जाहीर केल्या जात आहेत. यामध्ये बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक नामवंत सितारे, विविध क्षेत्रातील व्यक्ती ह्या आपापल्या परीने समाजातील लोकांना जमेल त्या प्रकारे मदत करत आहेत.

परंतु हे ऐकून तुम्हांला सुद्धा दिलासा मिळेल की, आपल्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील खारीचा वाटा म्हणून फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात समाजातील गरजू लोकांना मदत करत आहेत.

d9172958fc1cfe9ec17b0a50f7418a2b

यामध्ये आता आपली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगङे ही देखील विनामूल्य जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो तुम्हांला माहित असेलच की अश्विनी महांगङे ही “सामाजिक भान जपणारी” अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

झी मराठी वाहिनीवरील “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेतून श्री शिवछत्रपतींची कन्या “राणूआक्का” यांची भूमिका निभावून तिने प्रेक्षकवर्गाची मने जिंकली आहेत. या मालिकेपूर्वी अश्विनी महांगङे हिने झी मराठीच्या “अस्मिता” या मालिकेतून मराठी सृष्टीत पदार्पण केले. तर सध्या ती स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या “आई कुठे काय करते” या प्रसिद्ध मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

See also  अबब! मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या मोहक फोटोंनी चाहत्यांवर केली जादू, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

7bc2acee27e0210e3310a108b8ef18cd

अभिनेत्री अश्विनी महांगङे हिने दोन वर्षांपूर्वी “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान” ची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानामार्फत आजपर्यंत कित्येक गरजूंना तिने मदत केली आहे. त्याचप्रमाणे “महावारी” या वेबसिरीजमधून त्यांनी सुरुवातीला महिलांच्या समस्यांबाबत जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. पुरंदर येथील रयत बुक बँक व रक्तदान शिबिर अशा सामाजिक कार्यात देखील ती आवडीने सहभाग घेते.

ह’ल्ली’च रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान अंतर्गत त्यांनी रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे व ती आपली जबाबदारी चोखपणे पार पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे अश्विनी महांगङे हिने फक्त एकाच ठिकाणी नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरू केला आहे. फलटण, सातारा, टिटवाळा, ठाणे, कल्याण, बारामती, शिरवळ, खंडाळा, सासवड, बेळगाव, इस्लामपूर, अंधेरी, घाटकोपर अशा विविध ठिकाणी विनामूल्य जेवणाची सोय गरजूंसाठी करून देत आहे.

See also  "देवमाणूस" मालिकेतील 'वंदी आत्या' खऱ्या आयुष्यात दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो...

IMG 3398

“या बिकट परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकाची गैरसोय होऊ नये, हाच या कार्यामागील एकमेव महत्त्वपूर्ण उद्देश आहे. सध्याच्या महासंकटात सर्वांनाच मदतीची गरज आहे. एक व्यक्ती म्हणून आपण देखील या समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून जमेल तशी मदत करणे, हे माणुसकीचे कर्तव्य आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. तुम्ही देखील थोडाफार हातभार लावा.” असे म्हणत अभिनेत्री अश्विनी महांगङे हिने इतरांना देखील मदतीचे आवाहन केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close