प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांचे कोरोनाने झाले नि’धन…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जगभरात कोरोना महामारीने कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. गोरगरीब जनते पासून ते अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटीज पर्यंत सर्वजण याच्या विळख्यात सापडत आहेत. “स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेतील राणूआक्का यांची भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगङे यांना सुद्धा पि’तृ’शो’क झाला आहे. अभिनेत्री अश्विनी महांगङे यांचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगङे यांचे वयाच्या 56 व्या वर्षी ‘को’रो’ना’मुळे’ निधन झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांचे भोर येथील खाजगी रु’ग्णा’ल’या’त उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद नि’ध’न झाले, असे समजले.

See also  कोरोनातून बरे झाल्यानंतर हा भ'यंकर रो'ग घेतोय जीव, राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली...
Advertisement

अभिनेत्री अश्विनी महांगङे ह्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्री म्हणून मागील काही वर्षांपासून प्रसिद्धीत झळकत आहेत. खरंतर समाजसेवा करण्याचा हा वारसा अश्विनी यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाला आहे. कारण अभिनेत्री अश्विनी महांगङे यांचे वडील प्रदीपकुमार महांगङे हे सामाजिक कार्यकर्ते आणि पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात.

Advertisement

भैरवनाथ देवालय ट्रस्टचे अध्यक्ष, भैरवनाथ स्कूल कमिटीचे सदस्य यांसारख्या अनेक संस्थांची जबाबदारी त्यांनी आपल्यावर घेतली होती. प्रदीपकुमार महांगङे यांनी सामाजिक बांधिलकी जपताना त्यासोबतच अनेक नाटके आणि मराठी चित्रपटांतून अभिनय सादर केला आहे. त्यामुळे कलेचा अनुभव तर त्यांना सुरूवातीपासूनच होता. तसेच त्यांनी बहुतेक चित्रपटांचे दिग्दर्शन सुद्धा केले होते.

आपला हा समाजसेवेचा आणि अभिनयाचा वारसा अभिनेत्री अश्विनी महांगङे ह्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहेत. अशातच मागील कित्येक वर्षांपासून अश्विनी ह्या वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत लोकांना मदत करत आहे. मग रक्तदान शिबिर असो किंवा महामारी संकटात लोकांना बेङ मिळवून देणे, अशा अनेक कार्यात त्या नेहमी तत्पर असतात.

See also  हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पडलीये या CSK क्रिकेटरच्या प्रेमात? जाणून घ्या कोण आहे तो क्रिकेटर...
Advertisement

104036039 1130331387339765 4400139995616788672 n

राजकारण असो वा सामाजिक कार्य असो, अशा अनेक नवनवीन उपक्रमांत प्रदीपकुमार महांगङे यांचा सहभाग असायचा. पण आता आपले हे लाडके व्यक्तीमत्व प्रदीपकुमार महांगङे हे आपल्याला सोडून देवाघरी गेले आहेत. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. प्रदीप यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर, मित्रपरिवारात आणि शेजारील गावांत शोककळा पसरली आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकचे संतप्त विधान म्हणाला, "म्हणून आपल्याला भीक मागायला लागते..."
Advertisement

Leave a Comment

close